जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमात बदल

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी


मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.


राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.


मा. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील. आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

Comments
Add Comment

Maharashtra Goverment On Government Aircraft And Helicopters : राज्य सरकारचा मोठा निर्णय: सरकारी विमानांच्या देखभालीचा 'प्लॅन' तयार; 'जीआर' मध्ये काय?

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी विमानांच्या आणि हेलिकॉप्टर्सच्या तातडीच्या कामांसाठी मोठा निधी

Vadhavan Airport : मुंबईचे तिसरे विमानतळ आता समुद्रात? बुलेट ट्रेन, मेट्रो आणि एक्सप्रेसवेची थेट एन्ट्री; वाढवणं बंदराशी थेट जोडणी, नक्की कुठे होणार?

पालघर : दळणवळण क्षेत्रात भारत आता एक मोठी झेप घेण्यास सज्ज झाला आहे. देशातील पहिले 'समुद्रातील विमानतळ' (Sea Airport) मुंबई

Canada America Conflict : कॅनडा-अमेरिका वाद शिगेला; कॅनेडियन विमानांवर ५०% कर लादण्याची ट्रम्प यांची धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कॅनडाविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे.  यावेळी त्यांनी

अजित पवारांकडील खात्यांबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील सत्तासंतुलन आणि मंत्रिमंडळातील खात्यांच्या

P. T. Usha: धावपटू पी.टी. उषा यांच्या पतीचे निधन; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा यांच्या पतीचे निधन झाले आहे. पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांनी वयाच्या ६७ व्या

Ajit Pawar's Plane Crash : अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताची सीआयडी चौकशी; राज्य सरकारचे आदेश

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या सखोल