अजित पवारांच्या विमान अपघाताची ‘डीजीसीए’कडून चौकशी सुरू

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर या भीषण दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) अधिकृत चौकशी सुरू केली आहे. अपघात नेमका कसा आणि कोणत्या कारणांमुळे झाला, याचा सखोल तपास करण्यासाठी डिजीसीए आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) यांची संयुक्त चौकशी सुरू असून, घटनास्थळी तज्ज्ञांची पथके दाखल झाली आहेत.


डिजीसीएचे प्रमुख फैझ अहमद किडवई यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी ८.४० ते ८.५० वाजताच्या दरम्यान घडला. अपघातानंतर तातडीने डिजीसीए आणि 'एएआयबी'ची पथके घटनास्थळी पोहोचली असून, विमानाच्या अवशेषांचे बारकाईने विश्लेषण करण्यात येत आहे. तसेच या अपघाताचे नेमके कारण समजून घेण्यासाठी ब्लॅक बॉक्सचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे.


या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल पुढील काही दिवसांत येण्याची शक्यता असून, अंतिम अहवाल नियमानुसार सहा ते बारा महिन्यांच्या कालावधीत सादर करण्यात येईल, असे डिजीसीएने स्पष्ट केले आहे. तपासादरम्यान गरज भासल्यास विमान निर्माता कंपनी बम्बार्डिअर तसेच इंजिन तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. या विमानात दोन प्रवासी आणि तीन क्रू मेंबर्स होते आणि या अपघातात विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याचे डिजीसीएने स्पष्ट केले आहे.

नेमकी कशाची चौकशी होणार ?


चौकशीदरम्यान विमानाचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर तपासण्यात येणार आहेत. यासोबतच विमानाची मेंटेनन्स नोंद, तांत्रिक स्थिती आणि पूर्व इतिहास, अपघातावेळी असलेली हवामान परिस्थिती, पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्यातील संवाद, लँडिंग अप्रोच तसेच विमानाच्या इंजिन, कंट्रोल सिस्टीम आणि लँडिंग गियरमधील संभाव्य तांत्रिक बिघाड या सर्व बाबींवर चौकशीत विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai BJP President MLA Amit Satam : बीएमसीकडून सर्व आरोग्यविषयक खरेदी GeM पोर्टलद्वारे केली जाणार – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

बीएमसी रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांची रिअल-टाइम माहिती दर्शविण्यासाठी ऑनलाइन डॅशबोर्ड विकसित केला जाणार;

Middle East War : युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत १७ टक्क्यांची घसरण

मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय

Pod Taxi : लवकरच मुंबईत धावणार भारतातील पहिली 'पॉड टॅक्सी'

मुंबई : मुंबई शहरं हे कधीच विश्रांती घेत नाही इथे २४ तास सतत वर्दळ पाहायला मिळते असते. मुंबईत लोकांची गर्दी

Bmc News : मुंबईत ई-कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा

महापालिकेत ठरावाच्या सूचनेद्वारे झाली मागणी मुंबई : शहरात झपाट्याने वाढणाऱ्या ई-कचऱ्याच्या समस्येवर तोडगा

Ashwini Bhide : रस्ते सिमेंटीकरण कामांना कोणतीही मुदतवाढ नाही

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या

BMC News : मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डयांच्या दुरुस्ती खर्चात ७५ टक्के घट

तब्बल २०२ कोटींवरुन खर्च आता अंदाजे ४४ कोटींवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या