उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या ब्रिटीशकालिन पर्जन्य जलवाहिन्यांचे ५० वर्षांनी वाढणार आयुष्य

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई शहर विभागातील १०० वर्षे जुन्या भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे

Kishori Pednekar: विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या पेडणेकर आधीच पोहोचल्या नाल्याच्या काठावर

मुंबई: मुंबई महापालिकेत मागील २५ वर्षांत सत्तेवर असताना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाही तर जुनच्या

प्रकल्पबाधितांच्या सदनिका वाटपाची प्रक्रिया सुलभ करा; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले मालमत्ता विभागाला निर्देश

मुंबई: मुंबईतील सदनिकांची वाढती मागणी लक्षात घेता, प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी (पी ए पी) सदनिका उपलब्ध करून

Ashwini Bhide: गारगाईसह समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला गती द्या; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे जलखात्याला आदेश

मुंबई: समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी महानगरपालिकेने हाती घेतलेल्या २०० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या ४००

मध्य रेल्वेचा शनिवार, रविवार मेगा ब्लॉक; उपनगरीय व मेल-एक्स्प्रेस सेवांवर मोठा परिणाम

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे ४ एप्रिल २०२६ रोजी ठाणे व डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्तार तसेच परळ आणि करी रोड

महापालिका आयुक्तपदी नियुक्ती होताच आश्विनी भिडे यांनी घेतला धाडसी निर्णय

ई-ऑफिस,पेपरलेस करण्याचे सर्व खात्यांना दिले आदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी