Ajit Pawar Passed Away : महाराष्ट्र सुन्न! बारामतीत भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन

बारामती : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या दुर्दैवी घटनेत विमानातील सर्व ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.


आज सकाळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत दाखल होणार होते. विमान धावपट्टीवर उतरत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला. सुरुवातीला उपमुख्यमंत्री गंभीर जखमी असून त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, काही वेळातच DGCA कडून अधिकृत दुजोरा मिळाला की, अपघात इतका भीषण होता की विमानातील सहाही जणांनी आपले प्राण गमावले आहेत.



प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल


अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि मदतकार्य पथके घटनास्थळी रवाना झाली. विमानाचा चक्काचूर झाला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे राज्यावरील निवडणूक प्रचाराचे सावट अधिकच गडद झाले असून, सर्व नियोजित सभा रद्द करण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू