Raigad Crime : रानात लाकडे गोळा करायला गेलेल्या महिलेसोबत विकृत माणसाचा विनयभंग ;रायगडमधील संतप्त घटना

रायगड : महिलांच्या सुरेक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे.महिलांवरील अत्याचार थांबत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एका विधवा महिलेसोबत अत्याचाराची संतापजनक घटना घडली असून त्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.

रोहा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावालगत असलेल्या बेलवाडी शेजारील रानात ही घटना २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. घरगुती वापरासाठी जळणाचे लाकूड गोळा करण्यासाठी गेलेली ही विधवा महिला एकटी असल्याची संधी साधून त्याच गावातील एका इसमाने तिचा विनयभंग केला. ग्रामीण भागात महिलांना दैनंदिन कामासाठीही सुरक्षितता नसल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पीडित महिला रानात लाकडी फाटे गोळा करत असताना आरोपी तिच्याजवळ आला. त्याने अचानक तिचा हात पकडत “तुझा नवरा मेला आहे, मग तुझं कसं काय?” असे अत्यंत नीच, अपमानास्पद आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर आरोपीने जबरदस्तीने महिलेला जवळ ओढून तिच्या स्त्रीसन्मानाला आणि लज्जेला धक्का पोहोचवणारे कृत्य केले. या प्रकारामुळे महिला प्रचंड घाबरून गेली असून तिला मानसिक धक्का बसला आहे. घटनेनंतर पीडित महिलेने धैर्य दाखवत रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक १७/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

या घटनेनंतर नागरिक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
Comments
Add Comment

Nashik : रिंग रोडच्या मुद्द्यावर, निश्चितपणे मार्ग काढणार - मंत्री गिरीश महाजन

नाशिक : रिंग रोडच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना महाजन म्हणाले, “या प्रकरणात १५ ते २० टक्के

Nashik News : 'आपला कुंभ, आपली जबाबदारी' पुस्तिकेचे प्रकाशन

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा नाशिककरांसह सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी

India vs England : टीम इंडियासमोर इंग्लंडचे ३८८ धावांचे कठीण आव्हान

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा आणि निर्णायक सामना लॉर्ड्सवर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणफेक

Salman Khan : सलमान खानच्या तब्येतीला काय झालं ? चाहत्यांचं टेन्शन वाढलं!

मुंबई(Mumbai) : बॉलीवूडचा भाई जान म्हणजेच सलमान खान हा त्याच्या फीट बॉडीमुळे नेहमी चर्चेत असायचा. मात्र सध्या सोशल

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री तरुणावर गोळीबार; पुढे जे घडलं ते एखाद्या सिनेमासारखंच…

पुणे : पुणे जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. जुन्या वादातून 23 वर्षीय तरुणावर

Skirt Fashion: स्टायलिश दिसायचंय? मग हे ट्रेंडी स्कर्ट नक्की ट्राय करा