Pune Crime News : रुपाली चाकणकर यांनी घेतली इंजिनिअर दीप्ती चौधरीच्या कुटुंबियांची भेट

पुणे : पुण्यातील सोरतापवाडी (ता. हवेली) येथे इंजिनिअर दीप्ती चौधरी (२८ वर्षीय) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी दीप्तीचा पती, सरपंच सासू, शिक्षक सासरे आणि दीर अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हुंड्यासाठी छळ आणि मुलगी नको म्हणून जबरदस्तीने केलेला गर्भपात यामुळे दीप्ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती समोर आली आहे.


अशातच आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दीप्तीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. रूपाली चाकणकर यांच्यासोबत उरुळी कांचन पोलिसांनी देखील दीप्तीच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दीप्तीच्या कुटुंबीयांच्या मागण्या ऐकून घेतल्या. राजकीय हस्तक्षेप वाढत असल्यामुळे आरोपींवर कारवाई होत नसल्याचा आरोप दीप्तीच्या कुटुंबियांनी यावेळी केला आहे. या भेटीनंतर रुपाली चाकणकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे.


काय म्हणाल्या रुपाली चाकणकर ?


कुठल्याही महिलेला किंवा लेकीला त्रास झाला तर तिने तातडीने कळवायला हवे. तसेच आपणही ठामपणे तिच्या पाठीशी उभे राहायला हवे. तुम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्यासाठी अनेक पथकं आहेत. सासरी नांदणाऱ्या लेकीला त्रास झाला तर तिच्यासाठी काय? तर तिच्यासाठी काही व्यासपिठ आहेत. वन स्टॉप सेंटर पासून अगदी तिचे आणि तिच्या कुटुंबियांचे काऊंसिलिंग करणे, तिला वकील देण्यापासून शेवटच्या क्षणापर्यंतची तिची लढाई लढण्यासाठी मोफत वकील असतात. हे सर्व गोपनिय ठेवलं जातं. अगदी आई-वडिलांशिवाय कोणालाही माहिती नसतं. ती वन स्टॉप सेंटरमध्येही जाऊन तक्रार करु शकते.


पुढे त्या म्हणाल्या, "आमची टीम वेगळ्या पद्धतीने काम करते. कायदा हा खूप कठोर आहे. कायद्याच्या चौकटीतून या सगळ्या प्रक्रिया होत राहतात. महाराष्ट्रातील कायदा हा भारतातील सर्वात सक्षम कायदा आहे. म्हणून तुम्हाला काही शंका असतील तर जरुर सांगा. आपणच आपल्या लेकींच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू. आता आपणच ही शपथ घेऊ."


नेमकं प्रकरण काय ?


दीप्तीचा विवाह २०१९ मध्ये रोहन चौधरी याच्याशी मोठ्या थाटामाटात झाला होता. लग्नात ५० तोळे सोने देऊनही सासरच्यांची पैशांची हाव संपली नाही. माहेरून १० लाख रुपये रोख आणि चारचाकी गाडीसाठी २५ लाख रुपये देऊनही तिचा छळ सुरूच होता. "तू दिसायला सुंदर नाहीस, तुला घरातील कामे येत नाहीत," असे टोमणे मारून दीप्तीचे सतत मानसिक खच्चीकरण केले जात होते. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण केली जात होती, अशी तक्रार दीप्तीच्या आईने दिली आहे. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दीप्तीला झालेली गर्भपाताची सक्ती. दीप्तीला पहिली मुलगी होती. दुसऱ्यांदा ती गरोदर असताना, 'वंशाला दिवा हवा' या हट्टातून सासरच्यांनी तिची जबरदस्तीने गर्भलिंग तपासणी केली. पोटातील बाळ मुलगी असल्याचे समजताच, तिची इच्छा नसतानाही तिला गर्भपात करण्यास भाग पाडले गेले. या अमानुष प्रकारामुळे दीप्ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडली होती. विशेष म्हणजे, दीप्तीची सासू सुनीता चौधरी या सोरतापवाडीच्या विद्यमान सरपंच आहेत, तर सासरे कारभारी चौधरी हे शिक्षक पेशात आहेत. समाजात जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींनीच अशा प्रकारे हुंडा आणि स्त्रीभ्रूण हत्येसारखे गुन्हे केल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

लांजात जि.प.च्या ४ तर पं.स.च्या पाच उमेदवारांनी अर्ज मागे, जि.प. साठी ९ तर पंचायत समितीसाठी २६ उमेदवार रिंगणात

लांजा (संतोष कोत्रे) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या २७ जानेवारी रोजी

सावंतवाडी तालुक्यात एक जिल्हा परिषद तर एक पंचायत समिती सदस्य बिनविरोध

शेर्ले पंचायत समिती गणातून भाजपचे महेश धुरी बिनविरोध, तालुक्यात तब्बल ४८ जणांनी अर्ज घेतले मागे सावंतवाडी :

पक्षशिस्तीचे उदाहरण : खासदार नारायण राणेंच्या आदेशानुसार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवींची निवडणुकीतून माघार

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली

राजापुरात जि.प. गटातून चार जणांची तर पंचायत समिती गणातुन १६ जणांची माघार

राजापूर : :राजापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरीता मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या

परळी वैजनाथमध्ये १३ फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे तेरा ते पंधरा फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी

पनवेल महापालिकेचा डंका, १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत इ गव्हर्नन्समध्ये राज्यात प्रथम

पनवेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत इ गव्हर्नन्स