Bank Strike: बँकांचा आज देशव्यापी संप; ‘या’ बँका राहणार बंद

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या (Bank Strike) ५ दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या मागणीसाठी २७ जानेवारी २०२६ रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे देशभरातील विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील (पब्लिक सेक्टर) बँकांच्या शाखांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि अनेक बँका बंद राहू शकतात. ८ मार्च २०२४ रोजी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनियन यांच्यात वेतन सुधारणा करारावर स्वाक्षरी झाली होती.या संयुक्त नोटमध्ये सर्व शनिवारी सुट्टी देण्यावर सहमती दर्शवण्यात आली होती.

परंतु त्यांना सुट्ट्या ह्या न मिळाल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी २७ जानेवारी रोजी बँक कर्मच्याऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे महाराष्ट्रासह देशभरातील बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. देशभरातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या नऊ संघटनांच्या संयुक्त मंचाने या संपाचे आवाहन केले आहे. मार्च २०२४ मध्ये झालेल्या करारात मान्य होऊनही '५ दिवसांचा आठवडा' अद्याप लागू न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.


संपाचे मुख्य कारण


पाच दिवसांचा आठवडा ही बँक कर्मचाऱ्यांची ही मागणी २०१५ पासून प्रलंबित आहे.प्रत्येक शनिवारी बँकांना सुट्टी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या विलंबाचा निषेध म्हणून आणि पाच दिवस काम, दोन दिवस सुट्टी लागू करण्यासाठी हा एकदिवसीय संप पुकारण्यात आला आहे. सध्याच्या नियमांनुसार, बँक कर्मचाऱ्यांना दर महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असते. सर्व शनिवारी सुट्टी देऊन आठवड्यात केवळ ५ दिवस काम असावे. ५ दिवसांचा आठवडा केल्यास कर्मचारी दररोज ४० मिनिटे अतिरिक्त काम करण्यास तयार आहेत, जेणेकरून कामाच्या तासांचे नुकसान होणार नाही.


Bank Strike: बँकांचा आज देशव्यापी संप;‘या’बँका राहणार बंद


या संपात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक यांसारख्या सर्व प्रमुख सरकारी बँकांचा समावेश आहे. खासगी बँकांचे कामकाज सुरू राहण्याची शक्यता असली तरी, चेक क्लिअरन्स यांसारख्या सेवांवर सरकारी बँकांच्या संपामुळे परिणाम होऊ शकतो. ८ मार्च २०१४ रोजी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनियन यांच्यात वेतन सुधारणा करारावर स्वाक्षरी झाली होती. या संयुक्त नोटमध्ये सर्व शनिवारी सुट्टी देण्यावर सहमती दर्शवण्यात आली होती. मात्र, वित्तीय सेवा विभागाकडून (DFS) याला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. गेल्या ९ महिन्यांपासून सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने युनियनने संपाचे हत्यार उपसले आहे.


ग्राहकांसाठी महत्त्वाच्या टिप्स


२७ जानेवारीला बँकांचे व्यवहार बंद राहतील, त्यामुळे चेक जमा करणे किंवा मोठे रोख व्यवहार आधीच करून घ्या. संपाच्या काळात नेट बँकिंग, यूपीआय (UPI) आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरू राहतील. संपाच्या काळात एटीएममधील रोख रकमेचा तुटवडा जाणवू शकतो, त्यामुळे आवश्यक रोकड आधीच काढून ठेवा.

Comments
Add Comment

Commonwealth Games 2026 : भारताने पदाकाचे खाते उघडले, झंडू कुमारला पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक

ग्लासगो : भारताने २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांच्या दुसऱ्या दिवसाचा शेवट एका पदकासह आणि अनेक दमदार कामगिरींसह

Minister Ravneet Singh Bittu : "मोदी मंत्रिमंडळात मोठी घडामोड! रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांचा राजीनामा; फेरबदलाच्या चर्चांना उधाण"

- राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी; मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना नवे वळण, पंजाबच्या राजकारणात सक्रिय

PM Narendra Modi : मोदींचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल! Gen Z पिढीचे मानले आभार; म्हणाले, “थँक यू फ्रेंड्स!”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम (Instagram) वर आणखी एक

BHARAT TAXI : मुंबई आणि पुणेकरांसाठी 'भारत टॅक्सी' सेवा सुरू; ट्रॅफिक असो किंवा पाऊस, भाडे राहणार निश्चित!

मुंबई: कॅब चालकांची भाडे नाकारण्याची कटकट, पीक अवर्समधील अव्वाच्या सव्वा दर आणि ट्रॅफिक किंवा पावसात होणारी

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी दिला मंत्र्यांना डिजिटल मंत्र! "फक्त पोस्ट नको, रील्स बनवा; तरुणांशी थेट संवाद साधा"

- केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सोशल मीडियावर अधिक सक्रिय राहण्याच्या सूचना; इन्स्टाग्रामवर संवादात्मक कंटेंटवर

Devendra Fadnavis : "तुका म्हणे उगे रहावे..."; म्हणत दिल्लीत जाण्याच्या चर्चांना फडणवीसांनी दिला पूर्णविराम

- दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा फुलस्टॉप! 'जे मिळालंय तेच सर्वोत्तम', समाधानाचा मंत्र" पंढरपूर :