पूर्व उपनगरातील एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार

कुर्ला पश्चिम ते घाटकोपर पश्चिमपर्यंत उड्डाणपूल


सचिन धानजी मुंबई : पूर्व उपनगरातील कुर्ला पश्चिम कल्पना टॉकीजपासून घाटकोपर पश्चिम येथील पंखेशाह बाबा दर्गापर्यंत एल. बी. एस. मार्गावर मुंबई महापालिकेच्यावतीने उड्डाणपुलाचे बांधकाम केले जाणार आहे. यासाठी अडीच हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ४ लेनचे हे उड्डाणपूल असेल, ज्यामध्ये दुहेरी वाहतूक असेल ज्यामुळे या पट्टयात होणारी वाहतूक कोंडी फुटणार आहे.


पूर्व उपनगरातील लाल बहादुर शास्त्री मार्ग वाहतुकीसाठीचा महत्त्वाचा मार्ग आहे. हा मार्ग कुर्ला आणि घाटकोपर या दाट वसाहत असलेल्या भागातून जातो. विद्यमान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना व्यापारी आणि निवासी बांधकामे आहेत. रस्त्याच्या बाजूला व्यावसायिक बाजारपेठा, मॉल्स, शाळा, पोलिस ठाणे, भाजी मार्केट, रुग्णालये आणि इतर सार्वजनिक इमारतीही आहेत. सध्या एल. बी. एस महामार्गावरील जंक्शनवर वाहतूक कोंडी निर्माण होते. या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढतो, इंधनाचा वापर जास्त होतो आणि वायुप्रदूषणांमध्येही वाढ होते. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि कोंडी सोडवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या उद्देशाने लाल बहादुर शास्त्री मार्गावरील कुर्ला पश्चिम कल्पना टॉकीज, येथून घाटकोपर पश्चिम पंखेशाह बाबा दर्गा पर्यंत विद्यमान एल.बी.एस. रस्त्यावर ४ मार्गिकांचे उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या पुलाच्या बांधकामासाठीच्या खर्चाचा अंदाज १६०० कोटी रुपये होता, त्या तुलनेत पात्र ठरलेल्या कंत्राटदार कंपनीने १७०० कोटी रुपयांची बोली लावली. परंतु यासाठी पालिकेने कंपनीला जागा उपलब्ध करून दिल्यास त्याचा खर्च कमी होवू शकतो. परंतु यासाठी कंत्राटदाराने जागा उपलब्ध करून दिल्यास त्यासाठी महापालिकेला पैसे मोजावे लागणार. यासाठी १० हेक्टर जमिनीची गरज आहे आणि ही जमिन महापालिकेच्या आसपास २५ किलोमीटर परिघातच उपलब्ध करुन द्यावी अशाप्रकारची अट आहे. त्यामुळे कास्टिंग यार्डचा खर्च आणि विविध खर्च पाहता याच्या बांधकामाचा खर्च विविध करांसह २५६० कोटी रुपये एवढा आहे. यासाठी आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड व जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड या संयुक्त भागीदारीतील कंपनीची निवड करण्यात आली. यासाठी सल्लागार कंपनी स्ट्रक्टकॉन डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड यांना साडेसोळा कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत दिंडोशी मनपा वसाहतीत दूषित आणि पिवळसर पाण्याचा पुरवठा

​मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 'पी पूर्व' (P-East) विभागांतर्गत येणाऱ्या गोरेगाव (पूर्व) येथील दिंडोशी मनपा वसाहत

प्रजासत्ताक दिनाला जोडून सुट्ट्यांमुळे महाराष्ट्र, गोव्यातील बस आरक्षणात वाढ

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या लाँग विकेंडमुळे महाराष्ट्र आणि गोव्यातील आंतरशहरी बस प्रवासात लक्षणीय वाढ होत

वीज वितरण क्षेत्राची कामगिरी राज्यभर सुधारली

राष्ट्रीय स्तरावर ऊर्जा क्षेत्र जास्त नफाक्षम मुंबई : वीज वितरण कंपन्यांच्या चौदाव्या

रविवारी तिन्ही मार्गांवर मोठा ब्लॉक

मुंबई : आज आणि उद्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला असून लोकल

राजकीय पक्षांची बॅनरबाजी, पालिकेची डोकेदुखी

वाहतुकीच्या कोंडीत भर, अपघाताची भीती मुंबई : महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आणि

मुंबईच्या महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

चर्चेतील कुठला नगरसेवक ठरणार सरस? मुंबई : मुंबईचा महापौर हा महायुतीचा होणार हे आता स्पष्ट झाल्याने मोठा पक्ष