इस्लामाबाद : पाकिस्तानमधील डेरा इस्माइल खान जिल्ह्यात एका लग्नसमारंभात भीषण आत्मघाती हल्ला झाला. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. पाकिस्तानमधील नेते नूर मेहसूद यांच्या घरी लग्नसमारंभात ही घटना घडली. यावेळी हल्लेखोराने स्वतःला स्फोटकांनी उडवून दिले. अचानक झालेल्या हल्ल्याने सगळ्यांना धक्का बसला. यावेळी नूर मेहसूद यांच्या घराचंही नुकसान झालं. तसेच ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले. स्थानिक पोलीस प्रमुख आदनान खान यांनी या घटनेची पुष्टी केली. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.