इस्रायलचा लेबनॉनवर केमिकल अॅटॅक, ह्युमन राइट्स वॉचचा गंभीर आरोप

योहमोर : इस्रायलने लेबनॉनमधील योहमोर गावात हिझुबल्लाह या अतिरेकी संघटनेच्या तळावर हल्ला करण्याच्या निमित्ताने एक केमिकल अॅटॅक अर्थात रासायनिक हल्ला केल्याचा आरोप ह्युमन राइट्स वॉच नावाच्या संस्थेने केला आहे. ह्युमन राइट्स वॉच ही एक मानवाधिकारांसाठी लढणारी संस्था आहे.


ह्युमन राइट्स वॉचच्या आरोपानुसार इस्रायलने योहमोर गावावर पांढऱ्या फॉस्फरसचा मारा केला. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या आंतरराष्ट्रीय करारानुसार कोणताही देश दुसऱ्या देशाविरुद्ध अथवा तिथल्या एका प्रदेशाला लक्ष्य करून रासायनिक (केमिकल्स) किंवा जैविक (बायॉलॉजिकल) हल्ला (अॅटॅक) करू शकत नाही. पण इस्रायलने योहमोर गावावर पांढऱ्या फॉस्फरसचा मारा केला आहे. दक्षिण लेबनॉनमधील योहमोर गावात निवासी भागाला लक्ष्य करून इस्रायलने तोफखाना आणि पांढरा फॉस्फरस वापरला. इस्रायली सैन्याने गावकऱ्यांना आणि दक्षिण लेबनॉनमधील डझनभर इतर रहिवाशांना स्थलांतर करण्याचा इशारा दिल्यानंतर हा हल्ला केला.


पांढरा फॉस्फरस हा एक धोकादायक रासायनिक पदार्थ आहे. तो मेणासारखा पिवळा किंवा पांढरा दिसतो आणि त्याला लसणासारखा वास येतो. हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर तो आपोआप जळतो, ज्यामुळे ८१५ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान निर्माण होते. शरीर पांढऱ्या फॉस्फरसच्या संपर्कात आल्यास जळू लागते. त्वचा आणि हाडे जळायला सुरुवात होते. या हल्ल्यातून वाचलेल्यांना गंभीर स्वरुपाच्या व्याधी, त्वचारोग, श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची आग होणे, हृदयक्रिया मंदावणे किंवा बंद पडणे, मृत्यू येणे अशा स्वरुपाचे त्रास होऊ शकतात. निवासी वस्तीत पांढरा फॉस्फरस मोठी आग लावू शकतो. यामुळेच पांढरा फॉस्फरस वापरून हल्ला करणे हे घातक आणि मानवतेच्या विरुद्ध असल्याचा आरोप ह्युमन राइट्स वॉचने केला आहे.


इस्रायलने युद्धाच्या निमित्ताने पांढऱ्या फॉस्फरसचा बेकायदेशीर वापर करणे ही चिंता वाढवणारी बाब आहे. याचे नागरिकांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. युद्ध आणखी घातक होऊ शकते; अशी भीती ह्युमन राइट्स वॉचने व्यक्त केली आहे. पण इस्रायलने पांढऱ्या फॉस्फरसचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप फेटाळला आहे. शत्रूविरोधात धुराचा पडदा तयार करण्यासाठी पांढऱ्या फॉस्फरसचा वापर केल्याचा दावा इस्रायलने केला आहे.


पांढरा फॉस्फरस फॉस्फेट खडकांमधून काढला जातो आणि तो लष्करी उद्देशांसाठी कवच, बॉम्ब किंवा रॉकेटमध्ये वापरला जातो. जाळल्यावर, तो फॉस्फरस पेंटॉक्साइडपासून बनलेला जाड पांढरा धूर निर्माण करतो. युद्धात, याचा वापर धुराचा पडदा तयार करण्यासाठी केला जातो जेणेकरून शत्रूला दाट धुरात काहीही दिसू नये.रात्रीच्या वेळी रणांगण प्रकाशित करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. शत्रूच्या जागा, वाहने किंवा साहित्य जाळण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. नागरी भागात किंवा नागरिकांजवळ आग लावणारे शस्त्र म्हणून त्याचा वापर करण्यास मनाई आहे, कारण त्यामुळे अंदाधुंद नुकसान होते. लष्करी कारवायांदरम्यान वापरल्यास ते बेकायदेशीर मानले जाते परंतु त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण होतो.


लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २ मार्च २०२६ ते ८ मार्च २०२६ दरम्यान इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये एकूण ४०० जणांचा मृत्यू झाला. यात ८३ मुले, ४२ महिला, ९ बचाव कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच २५४ मुले आणि २७४ महिलांसह १,१३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

Hayden Panettiere Passes Away : बालकलाकार ते हॉलीवूड स्टार! 'हिरोज' फेम अभिनेत्री हेडन पॅनेटीयरचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना