इराणसमर्थक पोस्ट करणे नागरिकांना पडले महागात; सहा परदेशी नागरिकांना अटक

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बहरीन देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी सोशल मीडियावर इराणसमर्थक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपावरून सहा परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक बांगलादेशी नागरिक मोहम्मद इस्राफिल मीर आणि पाच पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे.


स्थानिक माध्यमे आणि बहरीन न्यूज एजन्सीच्या अहवालानुसार, ही कारवाई गृह मंत्रालय आणि देशाच्या जनरल डायरेक्टरेट ऑफ अँटी-करप्शन अँड इकॉनॉमिक अँड इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी यांच्या तपासानंतर करण्यात आली. मंत्रालयाने आरोप केला आहे की अटक करण्यात आलेले व्यक्ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इराणच्या समर्थनार्थ “भ्रामक” व्हिडिओ आणि पोस्ट प्रसारित करत होते.



नागरिकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न :


अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी काही ठिकाणांवरील हल्ल्यांचे व्हिडिओ चित्रित करून ते ऑनलाइन पसरवले, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता होती तसेच सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कारवायांमध्ये सहा आशियाई नागरिकांचा सहभाग असल्याचे ओळखण्यात आले आहे.मंत्रालयाने सांगितले की अटक केलेल्या व्यक्तींविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यांच्या प्रकरणांची नोंद पब्लिक प्रॉसिक्युशनकडे पाठवण्यात आली आहे.



बहारीनचा सावध पवित्रा :


इराणशी संबंधित संघर्ष शेजारील देशांपर्यंत पसरल्यानंतर बहरीनच्या यंत्रणांनी ऑनलाइन भडकाऊ किंवा उत्तेजक सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी देखरेख वाढवली आहे. अधिकाऱ्यांनी देशातील नागरिक आणि परदेशी रहिवाशांना इशारा दिला आहे की, परवानगीशिवाय कोणतेही व्हिडिओ, छायाचित्रे किंवा माहिती विशेषतः राष्ट्रीय सुरक्षा किंवा सध्याच्या संघर्षाशी संबंधित शेअर करू नयेत.

Comments
Add Comment

Pirates kidnap Indians : सागरी चाच्यांचा धुमाकूळ, २२ भारतीयांसह ३० जणांचे अपहरण; येमेन आणि सोमालियाच्या समुद्रातील धक्कादायक घटना

येमेन : येमेन आणि सोमालियाच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सागरी चाच्यांनी दोन व्यावसायिक

China Visa : भारतीयांना व्यावसायिक कामांसाठी चीनला जाणे झाले कठीण

बीजिंग : चीनने भारतीयांसाठी व्यावसायिक व्हिसाच्या नियमांमध्ये बदल के

Imran Khan : इम्रान खान यांना रात्री रुग्णालयात हलवले; वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात पाठवले

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक इम्रान खान यांना रात्री कडक

Mehul Choksi's Lawyer : मेहुल चोक्सीच्या वकिलाच्या अडचणी वाढल्या; लंडनमध्ये लैंगिक अत्याचाराच्या चार आरोपांखाली अटक

लंडन : फरार हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांना ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली असून त्यांच्यावर

Kenya Helicopter Crash : केन्यामध्ये सफारीसाठी निघालेल्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; 5 अमेरिकन पर्यटकांसह सर्व 7 जणांचा मृत्यू

नैरोबी : केन्यामध्ये पर्यटकांना सफारीसाठी घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत

Prince Harry Meghan Markle UK Return : सहा वर्षांचा ‘वनवास’ संपणार? प्रिन्स हॅरी आणि मेगन ब्रिटनमध्ये परतण्याच्या तयारीत; मुलं शाही कुटुंबाच्या जवळ जाणार

लंडन : ब्रिटिश शाही कुटुंबापासून दूर झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल