बर्फाळ वादळाच्या धोक्यामुळे अमेरिकेत आणीबाणी

२० कोटी लोकांवर संकट; ७ हजारांहून अधिक विमानांची उड्डाणे रद्द


न्यूयार्क : अमेरिकेत बर्फाच्या वादळाच्या इशाऱ्यानंतर १५ राज्यांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर, दोन दिवसांत ७ हजारांहून अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. राष्ट्रीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, सुमारे दोन-तृतीयांश अमेरिकन प्रदेश हा वादळाच्या तडाख्यात येऊ शकतो.


वादळाच्या भीतीने लोक किराणा दुकानांवर गर्दी करत आहेत. अनेक दुकानांमध्ये पाणी, अंडी, लोणी आणि मांसाचा तुटवडा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की, वादळासोबत जोरदार बर्फवृष्टी, पाऊस आणि थंडी येईल, ज्यामुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक होऊ शकते. वाहतूक अधिकाऱ्यांनी वीकेंडला प्रवासात विलंब आणि रद्द होण्याची शक्यता वर्तवली आहे. अनेक मोठ्या शहरांमधील विमानतळांवरही याचा परिणाम झाला आहे.


शनिवारी अमेरिकेत ३,२००हून अधिक उड्डाणे आणि रविवारी सुमारे ४,८०० हून अधिक उड्डाणे रद्द झाली. अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये १० ते १४ इंच बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हे वादळ अमेरिकेच्या हाय प्लेन्सपासून सुरू होऊन हळूहळू पूर्वेकडे सरकेल. याच्या प्रभावामुळे मेम्फिस, नॅशविल, वॉशिंग्टन डीसी, बाल्टिमोर, फिलाडेल्फिया आणि न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरांमध्ये बर्फवृष्टी होईल. सदर्न रॉकीज आणि प्लेन्सपासून मिड-अटलांटिकमार्गे नॉर्थ-ईस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात बर्फ पडण्याचा अंदाज आहे. कोलोरॅडोपासून वेस्ट व्हर्जिनिया आणि बोस्टनपर्यंत अनेक भागांमध्ये १२ इंचांपेक्षा जास्त बर्फ पडू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

चीनसोबत करार केल्यास कॅनडावर १०० टक्के टॅरिफ लावणार: ट्रम्प

वॉशिंग्टन :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला कडक इशारा देत सांगितले आहे की, कॅनडाने जर

चीनची लोकसंख्या वर्षभरात ४० लाखांनी घटली; वृद्धांची संख्या वाढली

बँकॉक : कुटुंबनियोजनासारख्या योजना राबविल्याने आता चीनसमोर लोकसंख्येबाबत नवेच संकट उभे राहिले आहे. सरकारी

पाकिस्तानात लग्नमंडपात आत्मघाती हल्ला; ७ ठार

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील डेरा इस्माइल खान जिल्ह्यात एका लग्नसमारंभात भीषण आत्मघाती हल्ला झाला. या घटनेत ७

दीड तासांच्या उपचारांसाठी १.६५ लाख

न्यूयॉर्क : अमेरिकेतील आरोग्यसेवेचे विदारक वास्तव दाखवणारी एक घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

जॉर्जियात कौटुंबिक वादातून गोळीबार

भारतीय नागरिकासह चार जणांचा मृत्यू अटलांटा : अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात कथित कौटुंबिक वादातून झालेल्या

तैवानभोवती चीनचा लष्करी वेढा

२४ तासांत २६ विमाने, ६ युद्धनौकांची घुसखोरी बीजिंग : जगाच्या पाठीवर आधीच रशिया–युक्रेन आणि मध्य-पूर्वेतील