दीड तासांच्या उपचारांसाठी १.६५ लाख

न्यूयॉर्क : अमेरिकेतील आरोग्यसेवेचे विदारक वास्तव दाखवणारी एक घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. न्यूयॉर्कमध्ये एका व्यक्तीला अवघ्या दीड तासांच्या रुग्णालयातील उपचारांसाठी तब्बल १,८०० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे १.६५ लाख रुपयांचे बिल भरावे लागले, तेही चांगला मेडिकल इन्शुरन्स असतानाही.


संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमसच्या दिवशी कुटुंबासोबत आईस स्केटिंग करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. तीव्र वेदना होत असल्याने आणि फ्रॅक्चरची शंका आल्याने तो रुग्णालयात गेला. इमर्जन्सी रूममध्ये डॉक्टरांनी तपासणी करून एक्स-रे काढला आणि गुडघ्याभोवती क्रेप बँडेज बांधली. संपूर्ण प्रक्रिया सुमारे दीड तासात पूर्ण झाली.


तीन आठवड्यांनंतर इन्शुरन्स कंपनीने कळवले की, एकूण वैद्यकीय बिलापैकी १,८०० डॉलर्स रुग्णाला स्वतः भरावे लागतील, तर उर्वरित ६,३५४ डॉलर्स इन्शुरन्सद्वारे भरले जातील.


या घटनेनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी अमेरिकेच्या महागड्या आरोग्य व्यवस्थेवर टीका करत भारत व कॅनडातील तुलनेने परवडणाऱ्या आरोग्यसेवेशी तुलना केली. अमेरिकेत बहुतांश नागरिकांना खासगी किंवा सरकारी इन्शुरन्सच्या माध्यमातून उपचार मिळतात. मात्र तरीही किरकोळ दुखापतींसाठीही मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो, ही बाब या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment

चीनसोबत करार केल्यास कॅनडावर १०० टक्के टॅरिफ लावणार: ट्रम्प

वॉशिंग्टन :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला कडक इशारा देत सांगितले आहे की, कॅनडाने जर

चीनची लोकसंख्या वर्षभरात ४० लाखांनी घटली; वृद्धांची संख्या वाढली

बँकॉक : कुटुंबनियोजनासारख्या योजना राबविल्याने आता चीनसमोर लोकसंख्येबाबत नवेच संकट उभे राहिले आहे. सरकारी

पाकिस्तानात लग्नमंडपात आत्मघाती हल्ला; ७ ठार

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील डेरा इस्माइल खान जिल्ह्यात एका लग्नसमारंभात भीषण आत्मघाती हल्ला झाला. या घटनेत ७

जॉर्जियात कौटुंबिक वादातून गोळीबार

भारतीय नागरिकासह चार जणांचा मृत्यू अटलांटा : अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात कथित कौटुंबिक वादातून झालेल्या

तैवानभोवती चीनचा लष्करी वेढा

२४ तासांत २६ विमाने, ६ युद्धनौकांची घुसखोरी बीजिंग : जगाच्या पाठीवर आधीच रशिया–युक्रेन आणि मध्य-पूर्वेतील

इंडोनेशियातील जावा बेटावर भूस्खलन

आठ जणांचा मृत्यू; ८२ बेपत्ता जकार्ता : इंडोनेशियातील जावा या बेटाला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. शनिवारी पहाटे