यूट्युब बघून वजन कमी करण्यासाठी परस्पर औषधे घेतली अन्...

मदुराई : तामिळनाडूतील मदुराईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मदुराईत राहणाऱ्या एका तरुणीने यूट्युब बघून वजन कमी करण्यासाठी परस्पर औषधे घेतली. हा निर्णय तरुणीसाठी धोकादायक ठरलाय. डॉक्टरांच्या सल्ल्याविना केलेला औषधोपचार तरुणीसाठी जीवघेणा ठरला. चुकीची औषधे घेतल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला.


तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील सेलूर भागातील मीनांबलापूरम येथे राहणारी कलैयर्सी एका खासगी कॉलेजमध्ये पदवीच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. या तरुणीने वजन घटविण्यासाठी यूट्युब व्हिडीओ बघितले. या व्हिडीओंचा कलैयर्सीवर प्रचंड प्रभाव पडला. तिनं एका यूट्युब व्हिडीओवर विश्वास ठेवून स्थानिक मेडिकलमधून बोरॅक्स खरेदी केलं आणि त्याचं सेवन केलं.


बोरॅक्स म्हणजेच सोडियम बोरेट. हे एक प्रकारचे किटकनाशक रसायन आहे. पांढऱ्या शिसाचा वापर करुन हे विषारी रसायन तयार केले जाते. बोरॅक्स मानवी शरीराला अपायकारक आहे. पण या वास्तवाची माहिती नसल्यामुळे यूट्युब व्हिडीओ बघून कलैयर्सीने बोरॅक्स खरेदी केले. खरेदी केलेल्या बोरॅक्सचे कलैयर्सीने घरी येताच सेवन केले. बोरॅक्स शरीरात जाताच कलैयर्सीला उलट्यांचा त्रास सुरू झाला. थोड्याच वेळात ती बेशुद्ध पडली. घरातल्यांनी कलैयर्सीला तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी उपचार करुन कलैयर्सीला घरी पाठवले. रात्री कलैयर्सीची प्रकृती पुन्हा बिघडली. यावेळी कलैयर्सीला राजाजी सरकारी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सेलूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासात तरुणीने स्थानिक मेडिकलमधून बोरॅक्स खरेदी केल्याची माहिती मिळाली.


डॉक्टरांच्या सल्ल्याविना कोणतेही औषध घेऊ नको असे वडिलांनी बजावले असूनही वजन कमी करण्याच्या मोहापोटी कलैयर्सीने चूक केल्याचे लक्षात आले.


तोंडातील अल्सर कमी करण्यासाठी बाह्य औषध म्हणून मर्यादीत प्रमाणात बोरॅक्स वापरले जाते. पण बोरॅक्स वजन कमी करण्यासाठी वापरत नाहीत. वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायाम आणि योग्य आहार हा सुरक्षित आणि योग्य मार्ग आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कलैयर्सीने व्यवस्थित माहितीच घेतली नाही. कुठल्यातरी व्हिडीओवर आंधळा विश्वास ठेवून मोठी चूक केली.


शिक्षण आणि संशोधन न करता काही जण तज्ज्ञ असल्याचा दावा करत यूट्यूबवर कुठलीही गोष्ट औषध किंवा आहार म्हणून सुचवत आहेत. या व्हिडीओंना आळा घालण्याची आवश्यकता या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment

पंजाबमध्ये प्रजासत्ताक दिनापूर्वी रेल्वे रुळावर स्फोट

अमृतसर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर स्फोट झाल्याची

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंगळवारी सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली : संसदेत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारने राजकीय एकमत साधण्यासाठी तयारी सुरू केली आहे. बजेट

Video : धक्कादायक! पाच मुस्लिम मुलींनी हिंदू विद्यार्थिनीला घेरलं अन् बुरखा घालायला लावला; 'त्या' व्हिडिओने खळबळ

मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील बिलारी शहरात एका अल्पवयीन हिंदू विद्यार्थिनीसोबत घडलेल्या प्रकाराने खळबळ उडाली

Viral Video : जोरदार सामना झाला अन् वाघ झुकला!

सवाई माधोपूर : राजस्थानमधील जगप्रसिद्ध रणथंभोर टायगर रिझर्व्हमध्ये शुक्रवारी संध्याकाळी निसर्गाचा एक अत्यंत

Chhattisgarh Bridge Stolen : छत्तीसगडमध्ये मध्य रात्री कॅनलवर बनलेला स्टीलचा पुल चोरीला, चोरांची अनोखी चोरी..!

छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये कोरबा शहरात एक विचीत्र चोरीची घटना समोर आली आहे. छत्तीसगड येथे हसदेव लेफ्ट कॅनालवर

१ एप्रिलपासून जनगणना २०२७ चा पहिला टप्पा सुरू

नवी दिल्ली : देशातील बहुप्रतीक्षित ‘जनगणना २०२७’ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून १ एप्रिलपासून या