ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा


मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वन-डे, टी-२० आणि कसोटी सामने खेळणार आहे. २०२५ वनडे वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय संघाचा हा पहिला परदेशी दौरा आहे. या दौऱ्यातील वन-डे आणि टी-२० मालिकेसाठी यापूर्वीच संघांची घोषणा करण्यात आली आहे. पण या संघात एक बदल झाला आहे. तसेच एकमेव कसोटी सामन्यासाठीही भारतीय महिला संघाची घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. या कसोटी संघाव्यतिरिक्त, बीसीसीआयने एसीसी राइजिंग स्टार्स आशिया कपसाठी इंडिया 'ए' संघाची देखील घोषणा केली आहे. १५ फेब्रुवारीपासून टी-२० मालिकेने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर ६ ते ९ मार्च रोजी पर्थमध्ये होणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्याने या दौऱ्याचा शेवट होईल. भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर सांभाळणार असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. याशिवाय कसोटी संघात शफाली वर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, दीप्ती शर्मा या अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे.
याशिवाय २०२५ वर्ल्ड कपदरम्यान दुखापतग्रस्त झालेली प्रतिका रावलचाही कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ती या दौऱ्यातून भारतीय संघात पुनरागमन करू शकते.

वनडे टी-२० संघात बदल : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय महिला संघाची वनडे आणि टी२० मालिकांसाठी आधीच निवड झाली आहे. मात्र, यष्टीरक्षक फलंदाज गुनालन कमालिनी ही वूमन्स प्रीमयर लीग दरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने या संपूर्ण दौऱ्यातूनच बाहेर झाली आहे. त्यामुळे भारताच्या वनडे आणि टी२० संघात तिच्या जागेवर उमा छेत्रीला संधी देण्यात आली आहे.

एलिसा हेलीचा शेवटचा सामना : पर्थमध्ये होणारा दिवस-रात्र कसोटी सामना एलिसा हिली हिच्यासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. ती या सामन्यानंतर क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.

कसोटी संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, अमनजोत कौर, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा चेत्री (यष्टीरक्षक), प्रतिका रावल, हर्लिन देओल, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग ठाकूर, स्नेह राणा, क्रांती गौड, वैष्णवी शर्मा, सायली सातघरे.

वनडे संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), काशवी गौतम, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रीक्स, हर्लिन देओल.

टी २० संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधा), शफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिक्स, भारती फुलमाली, श्रेयंका पाटील.

इंडिया 'ए' (एसीसी राइजिंग स्टार्स आशिया कप) संघ: हुमैरा काझी, वृंदा दिनेश, अनुष्का शर्मा, दिया यादव, तेजल हसाब्नीस, नंदिनी कश्यप (यष्टिरक्षक), ममता एम (यष्टिरक्षक), सोनिया मेंढिया, मिन्नू मणी, तनुजा कंवर, प्रेमा रावत, सायमा ठाकर, जिंतिमणी कलिता, नंदिनी शर्मा.

भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२६


टी-२० मालिका

१५ फेब्रुवारी - पहिला टी२० सामना, सिडनी (दु. १.३० वाजता)
१९ फेब्रुवारी - दुसरा टी२० सामना, कॅनबरा (दु. १.३० वाजता)
२१ फेब्रुवारी - तिसरा टी२० सामना, ऍडलेड, (दु. २.०० वाजता)

वन-डे मालिका

२४ फेब्रुवारी - पहिला वनडे सामना, ब्रिस्बेन (स. ९.०० वाजता)
२७ फेब्रुवारी - दुसरा वनडे सामना, होबार्ट (स. ९.०० वाजता)
१ मार्च - तिसरा वनडे सामना, होबार्ट (स. ९.०० वाजता)

कसोटी सामना

६ ते ९ मार्च - दिवस-रात्र कसोटी सामना (स. ११ वाजता)
Comments
Add Comment

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या

ग्रँड स्लॅम ४०० व्या विजयाच्या उंबरठ्यावर नोव्हाक जोकोविच!

ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मेलबर्न : टेनिस जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या नोव्हाक

भारताचे विजयी आघाडीकडे लक्ष्य

रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी टी-२० लढत रायपूर : नागपूरमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, भारतीय