मुंबई कर्णावती एक्सप्रेस वांद्रे टर्मिनस येथून आणि वंदे भारत एक्सप्रेस २० डब्यांच्या रेकसह धावणार
मुंबई : २२ जानेवारी २०२५ - गाडी क्रमांक १२९३३/१२९३४ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद – मुंबई सेंट्रल कर्णावती एक्सप्रेसचे टर्मिनल मुंबई सेंट्रलवरून वांद्रे टर्मिनस येथे हलवणे, आणि (ii) गाडी क्रमांक २२९६१/२२९६२ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेसमध्ये १६ वरून २० डब्यांपर्यंत तात्पुरती वाढ करणे यांचा समावेश आहे.
गाडी क्रमांक २२९६१/२२९६२ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसमध्ये तात्पुरत्या स्वरूपात चार अतिरिक्त डबे जोडले जातील आणि २६ जानेवारी ते ७. मार्च या कालावधीत ही गाडी २० डब्यांच्या रेकसह धावेल. गाडी क्रमांक १२९३३/१२९३४ वांद्रे टर्मिनस – वात्वा / अहमदाबाद – वांद्रे टर्मिनस कर्णावती एक्सप्रेस तात्पुरत्या स्वरूपात २६. जानेवारी ते ०७ मार्च या कालावधीत मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनस येथून सुटेल/येईल. गाडी क्रमांक १२९३३ वांद्रे टर्मिनसवरून दुपारी १ . ५५ वाजता सुटेल, तर गाडी क्रमांक १२९३४ वांद्रे टर्मिनस येथे १२:३० वाजता पोहोचेल; बोरीवली आणि अहमदाबाद दरम्यानच्या उर्वरित वेळेत कोणताही बदल नाही.