सुप्रभात

कथनी योथी जगत में,
कथनी योथी जगत में, करनी उत्तम सार ।
कह कबीर करनी सबल, उतरै भौ - जल पार ।।


बोलणे आणि कृती करणे या दोन्हींमध्ये कृती करण्याला अधिक महत्त्व आहे. फक्त बोलण्यामुळे कुठलीही कामे साध्य होत नाहीत. आयुष्यात यश मिळविण्यासाठी कृती करणे वा प्रयत्न करणे फार आवश्यक असते. प्रयत्नाविना काहीही मिळत नाही, हे व्यवहारातील रोकडे वाक्तव आहे.


या रचनेत संत कबीर म्हणतात, 'नुसती बडबड करणे व्यर्थ आहे. त्यामुळे काहीच साध्य होते नाही. यशाचे शिखर गाठायचे असेल तर कृतिशील प्रयत्नवादच आवश्यक असतो. म्हणूनच कृतिशील राहणे हेच यशस्वी आयुष्याचे मर्म आहे. नियोजनपूर्वक योग्य मार्गाने काम केले की यशाची प्राप्ती होते. कृतिशिलता अतिशय महत्त्वाची आहे. इतकी की प्रयत्नवादी माणूस भवसागर पार करून पैलतीरावर पोहोचू शकतो. स्वर्गलोकाची प्राप्ती हवी असेल तर त्यासाठी उत्तम कर्माचे आचरण करणे अत्यावश्यक आहे. नुसत्या बोलण्याने वा चर्चेने काहीही निष्पन्न होत नाही.'


समर्थ रामदास हेही प्रयानवादाचे पुरस्कर्ते होते. ' केल्याने होत आहे रे। आधी केलेची पाहिजे ॥' असे त्यांचे प्रतिपादन होते. प्रयत्न हा सर्वोपरी आहे हे सांगताना त्यांनी म्हटलंय, यत्न तो देव जाणावा|| प्रयत्नपूर्वक नीटपणे अभ्यास केला तर असाध्य गोष्टीही साध्य होतात हे तत्त्व विशद करताना संत तुकारामांनी म्हटलंय,


असाध्य ते साध्य भारता सायास । कारण अभ्यास तुभा म्हणे ॥


'प्रयत्नांती परमत्रश्व' असे मराठी भाषेत एक सुभाषित आहे, त्याचा आशय हाच आहे. हेच तत्त्व संत कवीर यांनी मांडलं आहे. आपल्या आयुष्यातील कृतीचं वा प्रयत्नांचं महत्त्व सांगताना त्यांनी म्हटलंय की, प्रयत्नवादी माणूस आयुष्याची नौका पार करून पल्याड जाऊ शकतो. उत्कट, निष्ठापूर्वक आणि प्रयत्नपूर्वक भक्तीने परमेश्र्वरही वश होतो.



एका इंग्रजी तत्ववेत्यानं म्हटलंय, "The endless, systematic efforts is a key to the bright success."
देव, नशीब, भविष्य अशा भुलभूलैयात अडकण्यापेक्षा आयुष्यात प्रयत्नांची कास धरली तर आपल्याला हवे असलेले सोनेरी यश प्राप्त होईल. मनातली स्वप्ने साकार होतील. आयुष्य समर्थ, सार्थ आणि यथार्थ होईल. मनाचा समतोल राखला तर लौकिक यशाबरोबर आध्यात्मिक यशही साध्य होईल.

Comments
Add Comment

वसंत पंचमी २०२६ : ज्ञान, कला आणि नव्या सुरुवातीचा शुभ दिवस; जाणून घ्या सरस्वती पूजनाची परंपरा आणि महत्त्व

मुंबई : माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला साजरी होणारी वसंत पंचमी हा हिंदू धर्मातील विशेष मानाचा दिवस मानला जातो.

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात ७ दिवसीय माघी गणेशोत्स..

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात आज आपल्याला प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून येते. आज माघी

सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती...माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

माघी गणपती जयंती हा हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्म झाला आहे.

संत नामदेव

पतितपावन नाम ऐकुनी पतितपावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा । पतितपावन नव्हेसी म्हणुनी जातो माघारा ।। घ्यावे तेव्हा

संत एकनाथ

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥ भाव भक्ति भीमा उदक ते वाहे ।

एकमेका साह्य करू। अवघे धरू सुपंथ ॥

कोण जाणे कैसी परी। पुढे उरी ठेविता ।। अवघे धन्य होऊ आता। स्मरविता स्मरण ॥ तुका म्हणे अवधी जोडी। वे आवडी चरणांची