रांची : गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे सापळा रचून झारखंड पोलिसांनी सारंडाच्या घनदाट जंगलात अनेक नक्षलवाद्यांना चकमकीत ठार केले. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक कोटींचे बक्षीस लावलेला नक्षलवादी अनल दा ठार झाला. भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या शस्त्र हाती घेतलेल्या माओवादी गटाच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. पोलीस महानिरीक्षक मायकल राज यांनी नक्षलवादी अनल दा ठार झाल्याचे सांगितले. अनल दा व्यतिरिक्त आणखी किमान १४ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सारंडात छोटा नागरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभडीह गावाजवळच्या जंगलात चकमकीला सुरुवात झाली. अनल दा सहकाऱ्यांसह याच भागात असल्याची ठोस माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी तातडीने सापळा रचण्यास सुरुवात केली होती. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. अनल दा ठार झाला. पोलिसांनी घटनास्थळावरुन आतापर्यंत एक एके ४६ रायफल, एक इन्सास रायफल, एक एसएलआर, शेकडो जिवंत काडतुसांचा साठा साठा हा शस्त्रसाठा जप्त केला. ग्रामस्थांच्या मदतीने मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
अनल दा आणि त्याचे सहकारी गावाजवळच्या जंगलात असल्याची ठोस माहिती मिळाली. यानंतरच पोलिसांनी तातडीने सापळा रचण्यास सुरुवात केली होती. चकमकीत अनल दा ठार झाल्यामुळे आता एक कोटींचे बक्षीस असलेले दोनच नक्षलवादी झारखंडच्या जंगलात जिवंत आहेत. या नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे.