मुलुंड,भांडुपकरांना येत्या मंगळवार आणि बुधवारी करावी लागणार पाणीकपातीचा सामना

ठाणे शहरातील काही भागांचादेखील पाणीपुरवठा राहणार बंद


मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुलुंड (पश्चिम) येथील २४०० मिलीमीटर व्यासाच्या वैतरणा मुख्य जलवाहिनीवरील १२ जलजोडण्या या २७५० मिलीमीटर व्‍यासाच्‍या अप्पर वैतरणा मुख्य जलवाहिनीवर स्थलांतरित करण्याचे कामकाज हाती घेण्‍यात आले आहे. तसेच भांडुप (पश्चिम) येथील खिंडिपाडा परिसरातील २४०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या वैतरणा जलवाहिनीस लोखंडी झाकण बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्थलांतरण आणि दुरुस्ती कार्यवाही मंगळवार, २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या २४ तासांच्‍या कालावधीत मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ व ‘टी’ विभागातील काही भागांमध्ये तसेच ठाणे शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून - गाळून प्‍यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

 

‘टी’ विभाग : अमर नगर, गरखाचाळ, जय शास्त्री नगर, पंचशील नगर, हनुमानपाडा, राहुल नगर, मुलुंड वसाहत, मलबार हिल मार्ग, स्वप्ननगरी, वीणा नगर, योगी हिल, मॉडेल टाऊन मार्ग, बी. आर. मार्ग, वैशालीनगर, घाटीपाडा व गुरुगोविंद सिंग मार्ग लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम) (नियमित पाणीपुरवठा साधारण १८ तास)

 

‘टी’ विभाग :*मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), जे. एन. मार्ग, देवी दयाल मार्ग, क्षेपणभूमी (डम्पिंग) मार्ग, डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, महात्मा गांधी मार्ग, एन. एस. मार्ग, एस. एन. मार्ग, आर. एच. बी. मार्ग, वालजीलाढा मार्ग, व्ही. पी. मार्ग, मदनमोहन मालविय मार्ग, ए. सी. सी. मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुरगाव (नियमित पाणीपुरवठा २४ तास)

‘एस’ विभाग : खिंडिपाडा अ) लोअर खिंडिपाडा, ब) अप्पर खिंडीपाडा (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ५.०० ते सायंकाळी ५.००)

 
Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार