बदलापूर पश्चिमेच्या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केले. इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या व्हॅनमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या चालकाला पोलिसांनी पोक्सो अंतर्गत अटक केली आहे.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुन्ह्याशी संबंधित व्हॅनवर दगडफेक करुन संताप व्यक्त केला. पोलिसांनी हस्तक्षेप करुन दगडफेक करणाऱ्यांना व्हॅनपासून दूर नेले. कायद्यानुसार आरोपीवर कारवाई करू, असे सांगत पोलिसांनी नागरिकांना संयम पाळण्याचे आवाहन केले.