राज्यातील त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील समितीस ४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ३० जून २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला, या समितीच्या कार्यकाळास पाच जानेवारी पासून चार फेब्रुवारी २०२६ या कालावधीसाठी (एक महिना) मुदतवाढ देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

या समितीस १५ डिसेंबर २०२५ च्या शासन निर्णयान्वये पाच डिसेंबर २०२५ ते चार जानेवारी २०२६ या कालावधीकरिता एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, समितीचे कामकाजाप्रित्यर्थ समितीच्या संकेतस्थळावर विविध जनसामान्यांमार्फत प्राप्त प्रश्नावली व मतावलीद्वारे प्राप्त प्रतिसाद यावर विचारविमर्श व पुढील विश्लेषण करण्याच्या कार्यवाहीसाठी आता चार फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, यांनी  दोन जानेवारी २०२६ रोजीच्या पत्रान्वये सद्यस्थितीतील सुरू असलेल्या इतर कामकाजाच्या अनुषंगाने समितीच्या कार्यकाळास मुदतवाढ मिळणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते. तसेच समितीस एक महिन्याची मुदतवाढ देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत कळविले होते. त्यास अनुसरून त्रिभाषा धोरण समितीच्या कार्यकाळास एक महिना मुदतवाढ देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

Dr. Ashwini Joshi : डॉ. अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती, नवा आदेश जारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या (BMC) अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या बदलीच्या

BEST : कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वीच मेस्मा लागू, रजा मंजुरीवरही निर्बंध

मुंबई : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमातील १२ कामगार संघटनांच्या संयुक्त कृती

Vidyavihar Flyover : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; ४५ मिनिटांचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत!

मुंबई: मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या 'विद्याविहार उड्डाणपूल' (ROB) प्रकल्पाचे काम

Mumbai News : मुंबईत फूड डिलिव्हरी करणारी तरुणी पोलीस दलातील नोकरीसाठी करत आहे तयारी

मुंबई : गर्दीने व्यापलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर दिवसरात्र एक तरूणी धावत असते. हातात फूड डिलिव्हरी बॅग आणि

Megablock Update : रेल्वेच्या रविवारच्या मेगाब्लकविषयी मोठी बातमी

मुंबई : नीट यूजी २०२६ फेरपरीक्षा (NEET-UG 2026 Re-Exam) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार आहे. या फेरपरीक्षेच्या निमित्ताने प्रवास

EL Nino : एल निनोच्या प्रभावामुळे पाणीटंचाईचे सावट; धरणसाठा घटला, शासन यंत्रणा सतर्क

मुंबई : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी आधीच वर्तवली होती आणि