Mega Block : रविवारी ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे दिनांक २६ जुलै रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेन लाईनवर ठाणे ते कल्याण दरम्यान आणि ट्रान्स-हार्बर लाईनवर ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.



यामुळे प्रभावित होणाऱ्या सेवा खालीलप्रमाणे असतील:-


मेन लाईन

  • ठाणे - कल्याण अप आणि डाऊन जलद मार्ग: सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ०९.३४ ते दुपारी २.४५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवरही थांबतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

  • सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० या वेळेत कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद/अर्ध-जलद गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवरही थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर पुन्हा अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील; तसेच त्या आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल आणि एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५ व्या मार्गिकेवर वळवल्या जातील.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणाऱ्या अप मेल आणि एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान ६ व्या मार्गिकेवर वळवल्या जातील.




ट्रान्स-हार्बर लाईन:

  • ठाणे आणि वाशी/नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईन: सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत.

  • ब्लॉकच्या कालावधीत ठाणे आणि वाशी/नेरुळ/पनवेल दरम्यानच्या अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

  • ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ या वेळेत वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या 'डाऊन' ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा रद्द राहतील.

  • पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ या वेळेत ठाण्याकडे येणाऱ्या 'अप' ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा रद्द राहतील.

Comments
Add Comment

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता