Mulund Station : मुलुंड स्थानकात पादचारी पुलासाठी मध्यरात्री विशेष ब्लॉक

२५० टन क्रेनने गर्डर लाँचिंगचे काम; दोन लोकल फेऱ्या रद्द


मुंबई : मुलुंड रेल्वे स्थानकावर नवीन ६ मीटर रुंदीच्या पादचारी पुलासाठी गर्डर लाँचिंगचे काम करण्यात येणार असून, त्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक २५/२६ जुलै २०२६ (शनिवार-रविवार) च्या मध्यरात्री घेण्यात येणार आहे (Central Railway block). मुलुंड स्थानक परिसरात किमी ३०/१२२ ते ३०/१०८ दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २/३ दरम्यानच्या स्पॅन-१ तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ आणि ४ दरम्यानच्या स्पॅन-२ वर गर्डर बसविण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी २५० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनचा वापर करण्यात येणार आहे.हा ब्लॉक मुलुंड ते ठाणे दरम्यानच्या अप आणि डाउन धीम्या व जलद मार्गांवर घेण्यात येणार आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि रेल्वे पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी हा विशेष ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. या काळात प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना वेळापत्रक तपासावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.(Mulund Station)




ब्लॉकची वेळ :


अप आणि डाउन धीम्या मार्गावर : रात्री १.१० ते पहाटे ३.४० वाजेपर्यंत


अप आणि डाउन जलद मार्गावर : रात्री १.१० ते पहाटे २.१० वाजेपर्यंत



दोन लोकल फेऱ्या रद्द


२५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.२४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणारी सीएसएमटी–ठाणे लोकल


२६ जुलै २०२६ रोजी पहाटे ४.०४ वाजता ठाण्याहून सुटणारी ठाणे– सीएसएमटी लोकल

Comments
Add Comment

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता