T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री होणार, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे बांगलादेश सात फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेतून बाद झाला आहे. बांगलादेश वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्याने आता स्कॉटलँड संघाची T20 वर्ल्ड कप २०२६ मध्ये एन्ट्री होण्याची शक्यता आहे.


आयसीसीचे प्रतिनिधी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात चर्चा बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी चर्चा झाली. या चर्चेवेळी भारतात क्रिकेट खेळणार नाही, तिथे खेळाडूंच्या सुरक्षेला धोका आहे, असे कारण बांगलादेशकडून देण्यात आले. प्रत्यक्षात आंरतरराष्ट्रीय यंत्रणांनी भारत वर्ल्ड कपसाठी सुरक्षित देश असल्याचा अहवाल दिला आहे. हा अहवाल असताना बांगलादेशला कसली भीती वाटत आहे या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देणे त्यांना जमले नाही. अखेर आयसीसीने अंतिम निर्णयासाठी बांगलादेशला विहित मुदत दिली. ही मुदत संपण्याआधीच बांगलादेशने T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची घोषणा केली. बांगलादेशच्या बहिष्कारामुळे T20 वर्ल्ड कप २०२६ नव्या संघाच्या समावेशाबाबतची घोषणा आयसीसी लवकरच करणार असल्याचे समजते.


बांगलादेशने T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालण्याआधी आयसीसीच्या सर्व सदस्य देशांच्या प्रतिनिधींची एक ऑनलाईन बैठ झाली. या बैठकीत बांगलादेशच्या भूमिकेवर मतदान झाले. यात बांगलादेश आणि पाकिस्तान वगळता इतर सर्व देशांनी ठामपणे बांगलादेशच्या भूमिकेला ठाम विरोध दर्शवला. एकाकी पडत असल्याची जाणीव झाल्यानंतर बांगलादेशने अखेर T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची घोषणा केली.

Comments
Add Comment

ग्रँड स्लॅम ४०० व्या विजयाच्या उंबरठ्यावर नोव्हाक जोकोविच!

ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मेलबर्न : टेनिस जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या नोव्हाक

भारताचे विजयी आघाडीकडे लक्ष्य

रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी टी-२० लढत रायपूर : नागपूरमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, भारतीय

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून