ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही धक्कादायक मानली जानारी बातमी ठरली आहे. अवघ्या एका आठवड्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी करत पहीलं स्थान पटकावणारा विराट कोहली आता त्या खुर्चीवरून खाली आला आहे. भारत-न्यूझीलंड वनडे मालिका संपल्यानंतर आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीनुसार न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरिल मिशेल थेट नंबर-वन फलंदाज ठरला आहे.

डॅरिल मिशेलने इतिहास रचत आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवली आहे. सध्या त्याची रेटिंग 845 इतकी असून तो मोठ्या फरकाने अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मागील आठवड्यात मिशेल दुसऱ्या क्रमांकावर होता आणि केवळ एका रेटिंग पॉइंटने कोहलीच्या मागे होता. मात्र, भारताविरुद्धच्या मालिकेतील सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीच्या जोरावर त्याने थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या वनडेत शतकी खेळी केली होती, तरीही त्याला अव्वल स्थान कायम ठेवता आले नाही. सध्या कोहली दुसऱ्या स्थानावर असून त्याची रेटिंग 795 इतकी आहे. विशेष म्हणजे, आगामी काळात कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी दिसणार असल्याने पुन्हा नंबर-वन स्थान मिळवणे त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते.

दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मालाही या क्रमवारीत मोठा फटका बसला आहे. तो आता चौथ्या स्थानावर घसरला असून त्याची रेटिंग 757 आहे. संपूर्ण भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेत रोहितच्या बॅटमधून एकही अर्धशतक न निघाल्याने त्याला याचा फटका बसला. तिसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचा इब्राहिम झदरान असून त्याची रेटिंग 764 आहे. आयसीसी क्रमवारीतील या बदलांनी वनडे क्रिकेटमध्ये सध्या सुरू असलेली चुरस अधोरेखित केली आहे.
Comments
Add Comment

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो