सकाळी ट्रम्प यांचा धसका बाजारात सुरूच सेन्सेक्स ३४ अंकाने व निफ्टी १० अंकाने कोसळला मेटल शेअर्समध्ये मात्र वाढ

मोहित सोमण : एकीकडे शेअर बाजारात घसरणीचा पॅटर्न सुरु असताना हा आजही कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स व निफ्टीत घसरण झाली आहे. सुरूवातीच्या कलात शेअर बाजारात सेन्सेक्स ३४ अंकाने व निफ्टी १० अंकाने घसरला आहे. युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका नव्या घडामोडीत आपले लष्करी विमान ग्रीनलँड येथे पाठवले असून दुसरीकडे त्यांनी आपली ग्रीनलँडवरील मागणीला जोर पकडल्याने बाजारात अस्वस्थता कायम आहे. यासह त्यांनी युरोपियन राष्ट्रांवर ८ तारखेपासून १०% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळेच या सगळ्या भूराजकीय अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार नवी गुंतवणूक करणे टाळू शकतात. भारतीय बाजारातील कंसोलिडेशनची स्थिती कायम राहून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा एकदा बाजारातून विक्री वाढवतात का याकडे बाजाराचे लक्ष असेल. यासह आशियाई बाजारातील महत्वाच्या घडामोडी बघितल्यास चीनच्या मध्यवर्ती बँकेने कमकुवत आर्थिक निकाल लागून सुद्धा आपल्या व्याजदरात कुठलाही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तो एक वर्षासाठी ३% पाच वर्षासाठी ३.५% वर निश्चित राहणार आहे. मंगळवारी जपानच्या ४० वर्षांच्या सरकारी रोख्यांच्या (Goverment Bonds) उत्पन्नाने विक्रमी उच्चांक गाठला होता. सरकारी रोख्यांच्या मोठ्या विक्रीत गुंतवणूकदारांना चिंता होती की अन्न विक्री करात प्रस्तावित कपातीमुळे देशाची आर्थिक स्थिती बिघडू शकते त्यामुळेही आशियाई बाजारात अस्वस्थता कायम आहे. एकूणच गुंतवणूकदारांना साजेशी अशी बाजारात स्थिती नाही. त्यामुळे गुंतवणूकदार आपले नफा बुकिंगचे सत्र सुरू ठेवू शकतात.


दरम्यान सकाळच्या सत्रात दोन्ही बँक निर्देशांकात वाढ झाल्याने काहीसा आधार गुंतवणूकदारांना मिळाला आहे. तिमाहीतील बँकेच्या मजबूत निकालानंतर बँकिंग वित्तीय शेअर चांगली कामगिरी करत आहेत असे असताना जागतिक अस्थिरतेत क्षेत्रीय विशेष शेअर्सवर जागतिक घडामोडी व कंपन्यांच्या तिमाही निकाल असा दुहेरी परिणाम होऊ शकतो. या कारणामुळे गुंतवणूकदारांचे क्षेत्रीय विशेष निर्देशांकावर लक्ष केंद्रित झाले असेल. सकाळच्या सत्रात निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात वाढ केवळ मेटल, पीएसयु बँक निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण रिअल्टी, आयटी, फायनांशियल सर्विसेस २५/५०, मिड स्मॉल हेल्थकेअर, फार्मा निर्देशांकात झाली आहे.


आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात मात्र गिफ्ट निफ्टीसह शांघाई कंपोझिट, निकेयी २२५ निर्देशांकात घसरण झाली असून उर्वरित निर्देशांकात वाढ झाली आहे. युएस बाजारात काल तिन्ही बाजारात अस्थिरतेचा फटका बसत घसरण झाली होती. त्यामुळे आज गुंतवणूकदारांचा कल मोठ्या घसरणीकडे नसला तरी मोठ्या वाढीकडेही नसते असे प्रथमदर्शनी दिसत आहे.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ साई लाईफ (३.२७%), रिलायन्स पॉवर (२.८६%), ज्योती लॅब्स (२.८५%), जेके टायर्स (२.५८%), लेमन ट्री हॉटेल्स (२.५०%), कोलगेट पामोलिव (२.३६%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण आदित्य बिर्ला फॅशन (४.५१%), ओबेरॉय रिअल्टी (३.६२%), चोलामंडलम इन्व्हेसमेंट फायनान्स (३.५५%), एथर एनर्जी (२.३२%), लेटंट व्ह्यू (२.२८%), एसबीएफसी फायनान्स (२%), आयनॉक्स इंडिया (१.८९%), वरूण बेवरेज (१.६१%), गो डिजिट जनरल (१.५२%) समभागात झाली आहे.

Comments
Add Comment

धुमधडाक्यात प्रसाद ओकच्या मुलगा साखरपुडा संपन्न; कोण आहे होणारी सून ?

गेल्या काही दिवसांपासून मराठी फ्लीट इंडस्ट्रीमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर प्रसाद

Comrade Govind Pansare: गोविंद पानसरे हत्याकांडातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडा प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा आज सकाळी सांगलीत मृत्यू

स्मार्टफोनवर येणार ९ नवीन इमोजी

युनिकोड १८.० अपडेटमध्ये नव्या इमोजींचा समावेश आजच्या डिजिटल जगात आपण शब्दांपेक्षा इमोजीचा वापर अधिक करतो.

बंगळूरुत स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर

राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने २५ मे नंतर होणाऱ्या बंगळूरु येथील स्थानिक

बांगलादेशला निर्णय घेण्यास उद्यापर्यंत वेळ

अन्यथा आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलँड संघाला मिळणार संधी मुंबई : अवघ्या दोन आठवड्यांवर आलेल्या टी-२०

भारत-पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारीला क्रिकेटचे दोन सामने

आयसीसी टी-२० मध्ये महामुकाबला होणार मुंबई : क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान या २ देशांच्या