ट्रम्पनी शेअर केला अमेरिकेचा नवा नकाशा, नकाशात कॅनडा आणि ग्रीनलँडचा समावेश

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नकाशा शेअर केला आहे. या नकाशात ट्रम्प यांनी कॅनडा आणि ग्रीनलँडचा अमेरिकेची राज्य अशा स्वरुपात समावेश केला आहे. हा नकाशा ट्रम्प यांनी नाटो संघटनेचे सदस्य असलेल्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर, युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनाही दाखवला आहे. या नकाशामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.


ट्रुथ सोशलच्या दुसऱ्या पोस्टमध्ये, ट्रम्प उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मॅक्रो रुबियो यांच्यासोबत ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचा ध्वज फडकवताना दिसत आहेत. जवळच असलेल्या एका बोर्डवर लिहिले आहे : ग्रीनलँड, अमेरिकेचा भूभाग, २०२६ पासून...



कॅनडा हे अमेरिकेचे ५१ वे राज्य बनले पाहिजे, असे ट्रम्प अनेकदा म्हणाले आहेत. कॅनडासोबतच्या व्यापारात सबसिडी अर्थात सवलत दिल्यामुळे अप्रत्यक्षपणे अमेरिकेचे दरवर्षी २०० अब्ज डॉलरचे नुकसान होते. ही स्थिती बघता कॅनडाला अमेरिकेचे राज्य करुन घेणे व्यावहारिक असल्याचे ट्रम्प वारंवार म्हणाले आहेत. त्यांची हीच भूमिका ताज्या कृतीमुळे पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.


काही दिवसांपूर्वी अमेरिकेने कराकसवर हल्ला केला आणि व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण केले. यानंतर ट्रम्पने ग्रीनलँड हे अमेरिकेचे राज्य बनले पाहिजे, अशी जाहीर भूमिका घेतली आहे. आर्क्टिकमधील धोरणात्मक स्थान बळकट करण्यासाठी हे आवश्यक असल्याचे ट्रम्प म्हणाले. ताज्या कृतीने ग्रीनलँड बाबतची त्यांची भूमिका पुन्हा ठसठशीतपणे समोर आली आहे.

Comments
Add Comment

ट्रम्प वाढवताहेत जागतिक अस्वस्थता

अमेरिकेचे विक्षिप्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी कोणता निर्णय घेतील, कौतुक करता करता कधी पायाखाली घेतील, याचा

अयातुल्ला खाेमेनी यांच्यावर हल्ला म्हणजे थेट युद्धाला आमंत्रण

डोनाल्ड ट्रम्प यांना इराणचा इशारा तेहरान : इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी इराणचे सर्वोच्च नेते

विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र भारताचे गेट वे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या सर्व भागासाठी, वैविध्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक येणार दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज,

अफगाणिस्तान : काबुलमध्ये स्फोट, सात ठार

काबुल : अफगाणिस्तानमध्ये काबुलजवळ शहर ए नॉ जिल्ह्यात सोमवारी बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात किमान सात जणांचा

नोबेल मिळत नाही म्हणून संतापले ट्रम्प, केली धक्कादायक कृती

वॉशिंग्टन डीसी : जागतिक महाशक्ती अशी ओळख मिरवणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वागणं दिवसागणिक

इराणमधील हिंसक आंदोलनात आतापर्यंत ५ हजार जणांचा मृत्यू

तेहरान(वृत्तसंस्था): इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे आतापर्यंत किमान पाच हजार जणांचा मृत्यू झाला