इराणचा सौदीच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला, जगाची वाढली चिंता

तेहरान : अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण अशी लढाई सुरू झाल्यामुळे आखाती देशांमध्ये अस्थिरतेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. लढाईत तीन देश थेट सहभागी आहेत आणि दहा पेक्षा जास्त देशांचा लढाईत अप्रत्यक्ष सहभाग आहे. मध्य आशियाचे रुपांतर युद्धभूमीत झाले आहे. इराणने आखाती देशांतील अमेरिकेच्या विविध नौदल तळांवर तसेच हवाई दलाच्या तळांवर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांना अद्याप संबंधित आखाती देशांनी थेट प्रत्युत्तर दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर इराणने सौदी अरेबियाची राष्ट्रीय कंपनी असलेल्या 'अराम्को'वर ड्रोनद्वारे हवाई हल्ला केला.


जगातील सर्वात मोठी खनिज तेल कंपनी म्हणून मिरवणाऱ्या 'अराम्को'वर ड्रोनद्वारे हल्ला होणे ही बाब सौदीसाठी प्रतिष्ठेचा विषय झाली आहे. हल्ला झाल्यामुळे 'अराम्को'ने सोमवारी रास तनुरा येथील तेल शुद्धीकरण बंद केलं. रास तुनरा येथील तेल शुद्धीकरण बंद झाल्यावर बेंट क्रूड तेलाच्या किमती ९.३२ टक्क्यांनी वाढल्या.


खबरदारीचा उपाय म्हणून रास तनुरामधील तेल शुद्धीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात आली आहे. पण परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र सौदीच्या कंपनीवर हल्ला झाल्यामुळे अनेक देश चिंतेत आहेत. आखाती देशांतून जगाला मोठ्या प्रमाणात तेलाचा पुरवठा होतो. या परिस्थितीत आखाती देश लढू लागल्यापासून तेलाच्या दरात वाढ होऊ लागली आहे. तेलाच्या दरांनी गेल्या चार वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. होर्मुज सामुद्रधुनीतून होणारा व्यापार जवळपास ठप्प आहे.


जगातील अनेक देश अराम्को कंपनीकडून तेल खरेदी करतात. यात चीन, जपान, दक्षिण कोरिया, भारत, अमेरिका या प्रमुख देशांचा समावेश आहे. भारत दिवसाला १.१ मिलियन बॅरल्स खनिज तेल सौदी अराम्कोकडून खरेदी करतो. जपान त्यांच्या गरजेच्या ४० टक्के तेल खरेदी अराम्कोकडून करतो. यासोबतच फिलीपीन्स, मलेशिया, थायलंड, सिंगापूर, तैवान, पोलंड, नेदरलँड्स, इटली, स्पेन, फ्रान्स, ग्रीन, इजिप्त, जॉर्डन, बहारिन, दक्षिण आफ्रिकादेखील अराम्कोकडून खनिज तेल खरेदी करतात.


लढाईत तेल विहिरी आणि तेल शुद्धीकरण प्रकल्प यांना वारंवार लक्ष्य केले तर तेलाच्या किंमती उसळण्याचा धोका आहे. यामुळे युद्ध आणखी धोकादायक स्थितीत पोहोचण्याची शक्यता वाढली आहे.




Comments
Add Comment

Colombia Earthquake : कोलंबियाला भूकंपाचा भीषण धक्का! ७.४ रिश्टरचा शक्तिशाली भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर

बोगोटा : कोलंबियाच्या पश्चिम भागाला सोमवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या

Russian cosmonaut : रशियन अंतराळवीरांकडून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या विशेष शुभेच्छा

नवी दिल्ली : भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील रशियन

Japan warn US : अमेरिकन प्रचारात ॲनिमे व गेम्सचा वापर, जपानने अमेरिकेला सुनावले

टोकियो : जागतिक मुत्सद्देगिरीत एक अत्यंत अनोखा वाद समोर आला आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या जपानी संस्कृतीची ओळख

Iran-US tensions : जमिनीवरील हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याचा इराणचा इशारा, ट्रम्प यांच्या माघारीच्या प्रयत्नांना खीळ  

इराण आणि अमेरिका यांच्यातील भू-राजकीय तणाव दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. अमेरिकेचे लष्कर इराणी भूमीवर

Mumbai Terror Attack : २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल अजीजचा संशयास्पद मृत्यू; मशिदीच्या गेटवर अचानक कोसळला, विषप्रयोगाची शक्यता?

- इस्लामाबादमध्ये अनोळखी ठिकाणी जेवण केल्यानंतर काही वेळातच मृत्यू इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी

Russia-India Trade : भारतासाठी रशियाची मोठी योजना; हिंद महासागरापर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याचा विचार

मुंबई : भारत आणि रशियामधील व्यापार संबंध आणखी मजबूत करण्यासाठी रशिया नव्या पर्यायी मार्गाचा विचार करत आहे.