एससी, एसटी, ओबीसी आरक्षण ‘राजयोग’ आणणार

बविआकडे अनु. जमातीचे पाच, मागासवर्गीय तीन नगरसेवक


गणेश पाटील,विरार : वसई-विरार महापालिकेच्या महापौर पदाची आरक्षण सोडत गुरुवारी जाहीर होणार आहे. या सोडतीमध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यास बविआला केवळ आठ चेहऱ्यांमधून नवा महापौर निवडावा लागणार आहे. हेच आरक्षण महिलांसाठी राखीव झाल्यास एसटीमधील तीन तर एससी प्रवर्गातील केवळ दोनच महिला नगरसेवकांमधून एका महिलेला महापौर पदाची संधी दिली जाणार आहे. इतर मागासवर्ग या प्रवर्गाकरिता आरक्षण निघाल्यास बहुजन विकास आघाडीकडे ८ पुरुष नगरसेवक आणि ११ महिला नगरसेविका आहेत. त्यामुळे महापौर पदाचे आरक्षण कोणत्याही राखीव प्रवर्गाकरिता निघाल्यास, फार मोजक्या नगरसेवकांमधूनच एकाचे ‘राजयोग’ येण्याची शक्यता आहे.



शासनाने राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत १३ नोव्हेंबर २०१९ रोजी काढली होती, तर १४ नोव्हेंबर रोजी त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. ही आरक्षण सोडत काढली तेव्हा २७ महापालिका होत्या. आता मात्र २९ महापालिका आहेत. तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व महापालिकांसाठी महापौर पदाचे आरक्षण २२ जानेवारी रोजी नव्याने काढण्यात येणार आहे. महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यापूर्वी सर्व महापालिका क्षेत्रातील २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या, तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची माहिती शासनाने मागितली आहे.



दरम्यान, वसई-विरार महापालिकेचे महापौर पदाचे आरक्षण एससी प्रवर्गाकरिता जाहीर झाल्यास बहुमतात असलेल्या बहुजन विकास आघाडीकडे केवळ तीनच उमेदवार आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक १४ मधील सरिता मोरे, प्रभाग १९ मधील लता कांबळे, आणि प्रभाग २० मधील प्रसन्न भातणकर यांचा समावेश आहे, तर एसटी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्यास प्रभाग क्रमांक १ मधील जयंत बसवंत, १९ मधील संतूर यादव, २५ मधील रोहिणी जाधव, २७ मधील ज्योत्स्ना भगली, तसेच प्रभाग २० मधील रमेश घोरकना हे पाच उमेदवार महापौर पदाचे दावेदार आहेत.
ओबीसी या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्यास बहुजन विकास आघाडीकडे एकूण १९ उमेदवार आहेत. त्यापैकी ११ ह्या नगरसेविका आहेत. ओबीसी महिलांमध्ये बहुजन विकास आघाडीकडे ॲड. अस्मिता पाटील, अमृता चोरघे, प्रतिमा पाटील, नीता घरत, रुपाली पाटील, ज्योती म्हात्रे, ॲड. दीप्ती भोईर, योगिता पाटील, प्रार्थना मोंडे, प्रमिला पाटील आणि अलका गमज्या ह्या ११ उमेदवार आहेत, तर पुरुषांमध्ये नरेंद्र पाटील, स्वप्निल कवळी, अतुल साळुंखे, प्रफुल पाटील, सुनील आचोळकर, आशीष वर्तक, कल्पेश मानकर आणि पंकज चोरघे हे नगरसेवक महापौर पदाचे दावेदार
ठरू शकतात.



शेवटी कसं... आप्पा म्हणतील तसं


वसई-विरार महापालिकेत ११५ पैकी ७१ (पंजा निशाणीवरील एका उमेदवारासह) बहुजन विकास आघाडीकडे संख्याबळ आहे. त्यामुळे येथे बहुजन विकास आघाडीचाच महापौर होणार आहे ही बाब स्पष्ट आहे. महापौर पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गाकरिता, माहिलेकरिता किंवा कोणत्याही राखीव जागेसाठी जाहीर झाल्यास महापौर पदाचा निर्णय हा बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा माजी आमदार हितेंद्र ठाकूर हेच घेणार आहेत. त्यामुळे महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सुद्धा हितेंद्र ठाकूर हे धक्का तंत्राचा वापर करत, वसई-विरारचा प्रथम नागरिक होण्याची संधी कुणाला देतात याबाबत कुणीही अंदाज बांधू शकत नाही.

Comments
Add Comment

Palghar Blast Tarapur : तारापूर MIDC मध्ये भयंकर दुर्घटना! 'विराज प्रोफाइल'मध्ये एकापाठोपाठ ३ भीषण स्फोट; ३ कामगार जखमी

पालघर : तारापूर एमआयडीसीतील औद्योगिक क्षेत्रात आज (सोमवारी) सकाळी एकापाठोपाठ तीन महाभयंकर स्फोटांनी थरकाप

Chandigaon Tiranga Case : चंडीगाव ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणा, राष्ट्रध्वजाचा अवमान

डहाणू : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Palghar Gang Rape : धक्कादायक! पालघरमध्ये तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; तीन आरोपी अटकेत, तिघांचा शोध सुरू

Palghar Gang Rape : पालघर : पालघर जिल्ह्यातील तलासरी परिसरात 19 वर्षीय तरुणीवर सहा जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार (Gang Rape)

Jawharla Earthquake : पालघर जिल्हा हादरला! जव्हारला भूकंपाचे सलग धक्के! ४ वेळा हादरली जमीन

- नागरिकांनी भीतीच्या सावटाखाली जागून काढली रात्र पालघर : पालघर जिल्ह्यातील जव्हार परिसराला सोमवारी रात्री

Vasai Accident : आईच्या हातातून निसटलं अन् दुचाकीवरून पडून एक वर्षाच्या बाळाचा मृत्यू, वसईतील दुर्घटना

पालघर : वसईतील नायगाव (Vasai Accident) परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत दुचाकीवरून पडल्याने एक वर्षाच्या बाळाचा मृत्यू