एकमेका साह्य करू। अवघे धरू सुपंथ ॥

कोण जाणे कैसी परी। पुढे उरी ठेविता ।।
अवघे धन्य होऊ आता। स्मरविता स्मरण ॥
तुका म्हणे अवधी जोडी। वे आवडी चरणांची ॥


टणारी कामेही सोपी, सुलभ वाटू लागतात.
या अभंगात संत तुकाराम म्हणतात, 'भक्तिरंगाच्या वाटेवर वाटचाल करताना आपल्या आजूबाजूच्या परिसरातील समविचारी लोकांना भेटावे, त्यांच्याशी अध्यात्मिक विषयावर संवाद करावा, एकमेकांना आपल्या अडचणी सांगाव्यात आणि त्यावर उपाय शोधावेत. यामुळे दोघांचीही प्रगती होते.


आपल्या आयुष्यात भक्तीची संधी आली तर ती वाया घालवू नये. पुढे भविष्यात वा म्हातारपणी नामस्मरण करू, अशी चालढकल करू नये. पुढच्या काळात आपल्याला वेळ मिळेलच, असे नाही. आणि वृद्धपणापर्यंत आपण जगणारंच आहोत याचा कुठलाही भरवसा नाही. म्हणून आजब परमेश्वराचे चिंतन करावे. इतरांनाही सांगावे. त्यामुळे एकमेकांचा उत्साह वाढेल. धन्यतेची अनुभूती येईल. ईश्वराचे ठायी श्रद्धा आणि भक्ती ठेवली तर सारे आयुष्यच ईश्वरमय होईल. सर्वत्र आनंदाची पखरण होईल.


आपल्या आयुष्यात परस्पर सहकार्याने मोठमोठी कामे सहजपणे साध्य होतात. कामाची विभागणी झाल्यामुळे कुणा एकावर कामाचा अनावश्यक भार पडत नाही. एकमेकांच्या सहकार्याने व्यवहारातील वा अध्यात्मातील अनेक अडचणी दूर करता येतात. अनके अडथळ्यांवर मात करून इच्छीत कार्य साध्य करता येते.


संत समाजाचे मार्गदर्शक असतात. आपले चरित्र आणि विचार याद्वारा ते समाजमानाचे प्रबोधन करीत असतात. 'एकमेका साह्य करू' या ओळीमधून मानवता, प्रेम, आपुलकी, स्नेह, सद्भावना आदी भावना प्रकट होतार होतात. संत तुकारामांचा काळ हा परकी जुलमी सत्तेचा होता. अनके प्रकारचे अन्याय, जुलूम यामुळे लोक हवालदिल झाले होते. धार्मिक क्षेत्रात कर्मकांडाचा नावाखाली लोकांचे पद्धतशीर शोषण सुरू होते. नीतिमत्ता आणि मानवी मूल्याची घसरण झाली होती.


या पार्श्वभूमीवर 'अवधे धरू सुपंथ' ही संत तुकारामांची प्रतिज्ञा फार महत्त्वाची आहे. या ओळीद्वारा सत्य, नीती, सात्त्विकता, विवेक, त्याग, परोपकार, समर्पण या मूल्यांचा आविष्कार होतो. नितीसंपन्न, सुसंस्कृत समाज घडविणे हे संतांचे ध्येय होते. संतांनी केवळ अध्यात्मच सांगितले नाही तर संपन्न समान घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Comments
Add Comment

Babulnath Temple : मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी!

मुंबई : पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी (३ ऑगस्ट २०२६) संपूर्ण मुंबई शहर शिवभक्तीत चिंब भिजल्याचे

कर्म हेच ब्रह्मदेव

अंधारातून प्रकाशाकडे म्हणजेच अज्ञानातून ज्ञानाकडे या विषयाअंतर्गत आपण संचित प्रारब्ध ह्या संकल्पना समजावून

दशदिक्षु स्थितं दैवं, दशशक्तिसमन्वितम्

प्रभाती सूर नभी रंगती दशदिशा भूपाळी म्हणती पानोपानी अमृत शिंपित उषा हासरी हसते धुंदीत जागी होऊन फुले

नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ।।

कान्हो, ते तुझ्यासाठी केलेले दागिने काय पेटीत ठेवण्यासाठी केले आहेत? जरा अंगावर घाल, बिदरचे सरदार येणार आहेत आज

आत्मपरीक्षण

आत्मज्ञान - प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनातील सर्वांत गुंतागुंतीचा शोध कोणता, असा प्रश्न विचारला तर त्याचे

एतेषु रूपेषु लक्ष्मीः प्रकट्या

ऋतुराज-ऋतुराज केळकर   ‘घाव बसलं घावावर सोसायला... झुंझायाला... अंगी बळ येऊ दे... आभाळागत माया तुझी आम्हावर राहू