Comrade Govind Pansare: गोविंद पानसरे हत्याकांडातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडा प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा आज सकाळी सांगलीत मृत्यू झाला. माहितीप्रमाणे,डॉक्टरांनी त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. समीर गायकवाडची रात्रीच्या सुमारास अचानक तब्येत बिघडल्याने त्याला सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची घोषणा केली. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा साधक असून गोविंद पानसरे हत्याकांडातील प्रमुख संशयित होता. 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे गोविंद पानसरे यांची हत्या झाली होती. पानसरे यांच्यावर जवळून गोळी झाडण्यात आली होती आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पानसरे हे प्रगतीशील विचारांचे समर्थक आणि सामाजिक वर्तुळात प्रभावशाली व्यक्ती होते. गायकवाडाला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती आणि तो चार वर्षांपूर्वी जामीनावर बाहेर आला होता. तेव्हापासून तो सांगलीतील विकास चौक परिसरातील आपल्या घरात राहात होता. या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानला जाणारा गायकवाड मृत्यूनंतर तपास यंत्रणांसमोर या प्रकरणातील इतर आरोपी समोर आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

समीर गायकवाडच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. न्यायालयात हत्याकांडाचे खटले सुरु आहेत, परंतु गायकवाडच्या निधनामुळे प्रकरणाच्या पुढील तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन आणि पोलिस तपास यंत्रणा या घटनेची नोंद घेत, प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्याच्या दृष्टीने काम करत आहेत.
Comments
Add Comment

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; पाच बहिणींचा एकटा भाऊ, शेतात पतंग उडवताना थेट ...

अकोला : अकोला जिल्हातील मुर्तिजापूर येथे पतंग उडवण्याचा नादात एका १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवून

Borivali-Gorai Jetty : बोरिवली-गोराई आता फक्त १५ मिनिटांत! तासनतासांच्या प्रवासातून मुंबईकरांची सुटका; रो-रो जेट्टीचं काम सुरू

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बोरिवली आणि गोराई

Akshay Kumar Car Accident : अक्षय कुमारच्या डोळ्यासमोर सुरक्षा ताफ्याचा भीषण अपघात; मर्सिडीजने रिक्षेला चिरडले, जुहू परिसरात मध्यरात्री खळबळ

मुंबई : बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनाचा सोमवारी रात्री जुहू परिसरात भीषण

स्मार्टफोनवर येणार ९ नवीन इमोजी

युनिकोड १८.० अपडेटमध्ये नव्या इमोजींचा समावेश आजच्या डिजिटल जगात आपण शब्दांपेक्षा इमोजीचा वापर अधिक करतो.

बहुभाषिक चेहऱ्यातही मराठी टक्का भक्कम

मुंबई : महापालिकेच्या निकालाचे आकडे मुंबईच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक समीकरणावर शिक्कामोर्तब करीत आहेत.

‘एमआयएम’चे तेलंगणात ६७, तर महाराष्ट्रात शंभरहून अधिक नगरसेवक…

मुंबई : ‘एमआयएम’ या पक्षाचे आता तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात अधिक नगरसेवक आहेत. तेलंगणामध्ये केवळ ६७ नगरसेवक