दोन खासदारांसह अनेकांवर गुन्हा
वाराणसी : वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी काही ठिकाणी पाडकाम करण्यात आले असून, त्यावरून राजकारण तापले आहे. गेल्या दोन दिवसांपासून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत. यातील काही फोटो कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केले गेले असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. हेच फोटो व्हायरल करून समाजात भ्रम निर्माण केला जात असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाराणसी पोलिसांनी मणिकर्णिका घाटावर सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामाबद्दल सोशल मीडियावर एआय फोटो, व्हिडीओ आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याप्रकरणी आपचे खासदार संजय सिंह आणि काँग्रेसचे खासदार पप्पू यादव यांच्यासह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आठ लोकांविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.