नणंद भावजयीचा वाद ; मालमत्ता वादात प्रिया कपूरचा मोठा निर्णय

Sunjay Kapur Property Case: कपूर कुटुंबियातील मालमत्ता आणि वारसाहक्काचा वाद गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत राहिला आहे.मात्र,आता हा वाद केवळ संपत्तीपुरता मर्यादित न राहता वैयक्तिक चिखलफेकीपर्यंत पोहोचला आहे. उद्योगपती संजय कपूर यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबियातील अंतर्गत कलह आता कायदेशीर लढाईच्या एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. या प्रकरणात संजय कपूर यांच्या पत्नी प्रिय कपूर यांनी नणंद मंधिरा कपूर स्मिथ यांच्याविरोधात दिल्ली न्यायालयात धाव घेत फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.


मंधिरा कपूर स्मिथ यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून आपल्याविरुद्ध सातत्याने खोटी आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये केली त्यासोबतच सोशल मीडिया, विविध पॉडकास्ट आणि माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमधून मंधिरा यांनी आपली जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा खळबळजनक आरोप प्रिया कपूर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.यामुळे समाजात आपली असलेली प्रतिमा मलिण होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


पटियाला हाऊस कोर्टातील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर ही तक्रार सादर करण्यात आली. प्रिया कपूर यांच्या कायदेशीर टीमने न्यायालयात असा युक्तिवाद केला की, संजय कपूर यांच्या मालमत्तेशी संबंधित अनेक प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत. असे असूनही, मंधिरा कपूर यांनी जाहीरपणे या विषयांवर भाष्य करून आणि वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करून कायदेशीर मर्यादेचे उल्लंघन केले आहे. हे आरोप निराधार असून केवळ मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने केले जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.


दिल्लीतील न्यायालयात या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडली. प्रिया कपूर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग आणि वकील स्मृती अस्मिता यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, ज्या पद्धतीने मुलाखती आणि पॉडकास्टचा वापर बदनामीसाठी केला गेला, ते अत्यंत गंभीर आहे. न्यायालयाने या तक्रारीची दखल घेत तिची रितसर नोंदणी केली असून, यामुळे मंधिरा कपूर स्मिथ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


आगामी काळात या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हाय-प्रोफाइल कुटुंबामधील हा वाद आता फौजदारी स्वरूपाचा झाल्यामुळे दिल्लीच्या कायदेशीर वर्तुळात याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. मालमत्तेच्या वादातून सुरू झालेला हा संघर्ष आता मानहानीच्या दाव्यापर्यंत पोहोचल्याने कपूर कुटुंबियातील दरी अधिकच रुंदावली असल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

नितीन नवीन होणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री नितीन नवीन यांची भाजपच्या

जाणून घ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट दर, शिवाय तिकीट रद्द केल्यास मिळेल इतका रिफंड.. जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई: रात्रीच्या प्रवासासाठी खास तयार करण्यात आलेली वंदे भारत स्लीपर ट्रेन आता सेवेत दाखल झाली असून

मोदींना भेटण्यासाठी UAE चे राजे ४.२० वाजता दिल्लीत येणार आणि ०६.०५ वाजता मायदेशी रवाना होणार

नवी दिल्ली : संयुक्त अरब आमिराती अर्थात UAE चे राजे आणि अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान सोमवारी भारतात

निर्यातक्षम राज्यांत महाराष्ट्र आघाडीवर

नीती आयोगाच्या निर्यात निर्देशांकात तामिळनाडू मागे नवी दिल्ली : नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक -

गिफ्ट सिटीमध्ये १५ देशांच्या परकीय चलनांमध्ये करता येतात व्यवहार

भारतातील एक शहर जिथे रुपयांऐवजी वापरले जाते परकीय चलन नवी दिल्ली : आपल्याला भारतात कोठेही उद्योग करायचा असेल तर

मणिकर्णिका घाटावर बुलडोजर

दोन खासदारांसह अनेकांवर गुन्हा वाराणसी : वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.