मीरा-भाईंदर महापालिका सभागृहात ४२ नवीन चेहरे; महिलांचे वर्चस्व

भाईंदर : मीरा–भाईंदर महानगरपालिकेच्या नव्या सभागृहात यावेळी तब्बल ४२ नवीन चेहरे दिसणार असून, त्यामध्ये भाजपाचे ३२ आणि काँग्रेसचे १० नगरसेवक आहेत. तसेच एकूण ५१ महिला नगरसेविका निवडून आल्याने सभागृहात यंदा महिलांचे वर्चस्व प्रकर्षाने जाणवणार आहे. ९५ सदस्यांच्या महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला ७८, काँग्रेसला १३, शिवसेनेला ३ तर अपक्षाला १ जागा मिळाली आहे. या निवडणुकीत भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी नवीन, तरुण आणि उच्चशिक्षित उमेदवारांना संधी दिली होती.


या धोरणाचा फायदा दोन्ही पक्षांना झाला असून, सर्व नवीन चेहरे विजयी ठरले आहेत.


भाजपाचे ३२ तरुण व उच्चशिक्षित उमेदवार प्रथमच सभागृहात प्रवेश करणार आहेत. काँग्रेसनेही अनुभवी नगरसेवकांना डावलत १० नवीन उच्चशिक्षित उमेदवारांना उमेदवारी दिली होती आणि ते सर्व विजयी झाले. त्यामुळे यावेळी महापालिका सभागृहात तरुणाईचा प्रभाव दिसणार आहे.


महापालिकेतील २४ प्रभागांपैकी २३ प्रभागांत प्रत्येकी चार, तर एका प्रभागात तीन सदस्यांची निवड झाली आहे. ५० टक्के महिला आरक्षणानुसार ४८ जागा महिलांसाठी राखीव होत्या. मात्र, तीन प्रभागांत भाजपाने प्रत्येकी दोनऐवजी तीन महिलांना संधी दिली आणि त्या निवडून आल्याने महिला नगरसेविकांची संख्या ५१ वर पोहोचली आहे.


यामध्ये माजी महापौर निर्मला सावळे, डिंपल मेहता आणि ज्योत्स्ना हसनाळे यांचाही समावेश असल्याने, यावेळी मीरा–भाईंदर महापालिका सभागृहात महिलाराज पाहायला मिळणार आहे.

Comments
Add Comment

'क्राइम पेट्रोल'मध्ये पोलिसाची भूमिका; पण खऱ्या आयुष्यात २५ लाखांचा गंडा! अभिनेत्यावर नक्की काय ओढावलं?

डोंबिवली : गुन्हेगारीच्या सत्य घटनांवर आधारित प्रसिद्ध टीव्ही मालिका 'क्राइम पेट्रोल'च्या (Crime Patrol) माध्यमातून

Kalyan News : कल्याणमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणाचा संतापजनक प्रकार; रेबीजचे इंजेक्शन देताना चिमुरड्याच्या कमरेत अडकली तुटलेली सुई!

कल्याण: कल्याण पूर्व भागातून आरोग्याशी संबंधित एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.

Ullhasnagar Fire : धुराचे लोट अन् नागरिकांचा आक्रोश : उल्हासनगरमध्ये इमारतीला भीषण आग, १० हून अधिक वाहने भस्मसात

उल्हासनगर : उल्हासनगरमधील गजबजलेल्या वीनस चौक परिसरात असलेल्या ‘आशालोक’ इमारतीत मंगळवारी अचानक झालेल्या भीषण

Eknath Shinde : जालना घनसावंगीतील शेतकऱ्यांना विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याचे निर्देश

जालना-नांदेड समृद्धी महामार्गाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा ठाणे : जालना

Metro : ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत सर्वांना विश्वासात घेऊन प्रकल्प पुढे नेणार; लाखो ठाणेकरांच्या सोयीसाठीच अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी

लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी व्यापक जनजागृती

Thane Crime News : ठाण्यात धक्कादायक घटना! आंबे-घोसाळे तलावात आढळला अनोळखी महिलाचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

ठाणे : ठाणे पश्चिम येथील Castle Mill परिसरातील आंबे-घोसाळे तलावात एका अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा