मीरा-भाईंदर महापालिका सभागृहात ४२ नवीन चेहरे; महिलांचे वर्चस्व

भाईंदर : मीरा–भाईंदर महानगरपालिकेच्या नव्या सभागृहात यावेळी तब्बल ४२ नवीन चेहरे दिसणार असून, त्यामध्ये भाजपाचे ३२ आणि काँग्रेसचे १० नगरसेवक आहेत. तसेच एकूण ५१ महिला नगरसेविका निवडून आल्याने सभागृहात यंदा महिलांचे वर्चस्व प्रकर्षाने जाणवणार आहे. ९५ सदस्यांच्या महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला ७८, काँग्रेसला १३, शिवसेनेला ३ तर अपक्षाला १ जागा मिळाली आहे. या निवडणुकीत भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी नवीन, तरुण आणि उच्चशिक्षित उमेदवारांना संधी दिली होती.


या धोरणाचा फायदा दोन्ही पक्षांना झाला असून, सर्व नवीन चेहरे विजयी ठरले आहेत.


भाजपाचे ३२ तरुण व उच्चशिक्षित उमेदवार प्रथमच सभागृहात प्रवेश करणार आहेत. काँग्रेसनेही अनुभवी नगरसेवकांना डावलत १० नवीन उच्चशिक्षित उमेदवारांना उमेदवारी दिली होती आणि ते सर्व विजयी झाले. त्यामुळे यावेळी महापालिका सभागृहात तरुणाईचा प्रभाव दिसणार आहे.


महापालिकेतील २४ प्रभागांपैकी २३ प्रभागांत प्रत्येकी चार, तर एका प्रभागात तीन सदस्यांची निवड झाली आहे. ५० टक्के महिला आरक्षणानुसार ४८ जागा महिलांसाठी राखीव होत्या. मात्र, तीन प्रभागांत भाजपाने प्रत्येकी दोनऐवजी तीन महिलांना संधी दिली आणि त्या निवडून आल्याने महिला नगरसेविकांची संख्या ५१ वर पोहोचली आहे.


यामध्ये माजी महापौर निर्मला सावळे, डिंपल मेहता आणि ज्योत्स्ना हसनाळे यांचाही समावेश असल्याने, यावेळी मीरा–भाईंदर महापालिका सभागृहात महिलाराज पाहायला मिळणार आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात भाजपच्या प्रतिभा मढवी २८ नगरसेवकांमधून अव्वल

७१.५६ टक्के विक्रमी मतदानासह विजयी ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ३९ पैकी २८ जागा जिंकत सुमारे ७५

उल्हासनगर महापालिकेच्या सत्तेची चावी ५० टक्के मराठी नगरसेवकांच्या हाती

उल्हासनगर : एकेकाळी सिंधी भाषिकांचे शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगरमध्ये यंदा महापालिका निवडणुकीत मराठी

नवी मुंबई महापालिकेत शिवसेना विरोधी बाकावर बसणार

नवीन आणि तरुण चेहऱ्याची चर्चा नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला (शिंदे गट) सत्ता मिळाली

अंबरनाथमधील सत्तासंघर्ष न्यायालयात

नगर परिषद सभा तहकुबीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आजच्या सुनावणीकडे लक्ष अंबरनाथ : राज्यात नुकत्याच

नवी मुंबईत तिरूपती देवस्थानाला ३.६ एकर भूखंड एक रुपयात

नवी मुंबई (प्रतिनिधी) : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक तिरुमला तिरूपती देवस्थानम बोर्डला नवी मुंबईत

ठाणे जिल्ह्यात शेतमाल निर्यातीसाठी मोठा प्रकल्प; भिवंडीत उभारणार अत्याधुनिक कृषी केंद्र

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ आणि निर्यात संधी उपलब्ध करून देण्यासाठी भिवंडी तालुक्यातील