कोकणातील रेल्वेगाड्या होणार विस्कळीत

तुतारी, मांडवी, कोकणकन्या एक्स्प्रेस विलंबाने धावणार


मुंबई : डिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन प्रकल्पाच्या पायाभूत कामानिमित्त पनवेल – कळंबोली दरम्यान विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक रविवार, २५ जानेवारी रोजी रात्रकालीन असेल. या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या मार्गात आणि वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तसेच या ब्लॉकमुळे तुतारी, मांडवी, कोकणकन्या एक्स्प्रेस विलंबाने धावतील.


मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने कळंबोली येथे ११० मीटर लांबीच्या ओपन वेब गर्डर उभारणीसाठी पनवेल – कळंबोलीदरम्यान अप व डाऊन मार्गावर विशेष वाहतूक ब्लॉक घेतला आहे. रविवारी मध्यरात्री १.२० ते रात्री ३.२० दरम्यान दोन तासांचा ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे गाडी क्रमांक २२१९३ दौंड-ग्वाल्हेर एक्स्प्रेस कर्जत – कल्याण – वसई रोड मार्गे वळविण्यात येईल. गाडी क्रमांक १२१३४ मंगळूरु – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस पनवेल येथे रात्री ३.१४ ते रात्री ३.२० दरम्यान थांबविण्यात येईल. या ब्लॉकमुळे प्रवाशांना त्रास होईल.


कळंबोली – पनवेलदरम्यान २५ जानेवारी रोजी मध्यरात्री १.२० ते पहाटे ५.२० दरम्यान चार तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉक कालावधीत काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात आणि मार्गात बदल केला आहे. गाडी क्रमांक २२१९३ दौंड – ग्वाल्हेर एक्स्प्रेस कर्जत – कल्याण – वसई रोड मार्गे वळविण्यात येईल.


गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस सोमटणे स्थानकांदरम्यान रात्री २.५८ ते पहाटे ५.२० या कालावधीत थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक २०११२ मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या एक्स्प्रेस पनवेल येथे पहाटे ४.०२ ते पहाटे ५.२० पर्यंत थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक ११००४ सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्स्प्रेस आपटा स्थानकात पहाटे ४.२५ ते पहाटे ५.१५ पर्यंत थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक १२६२० मंगळुरू – लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्स्प्रेस जिते स्थानकात पहाटे ४.४१ ते पहाटे ५.१० पर्यंत थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक १०१०३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव मांडवी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ८.२० वाजता पुनर्निर्धारित करण्यात येईल. गाडी क्रमांक १७३१७ हुबळी – दादर एक्स्प्रेस १५ मिनिटे उशिरा धावेल.

Comments
Add Comment

तुरुंगातूनच विजयाचा गुलाल!

गंभीर गुन्ह्यातील उमेदवारांना मतदारांची पसंती मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मशीद, सँडहर्स्ट रोड आणि काही थांबे रद्द मुंबई : मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार?

शरद पवार गटाकडून हालचालींना सुरुवात मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल आल्यानंतर, आता सर्वच राजकीय

मुंबईत ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधणार

महापालिका निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचे निकाल लागले आहेत.

मतदान अधिक, तरीही एमआयएमपेक्षा मनसेच्या जागा कमी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाला मिळालेले यश हा चर्चेचा विषय झाला आहे. या

मुस्लीम मतदारांची मते यापुढेही निर्णायक ठरणार

मुंबई : संपूर्ण राज्यातील महानगरपालिकांमध्ये एआयएमआयएमचे ९५ च्या आसपास नगरसेवक निवडून आले असून त्यात मुंबईतील