महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे ‘टीसीएस’कडून जतन

मुंबईतील राजाबाई टॉवर, ग्रंथालय इमारत, वस्तुसंग्रहालयाचे संवर्धन


मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सहकार्यामुळे (टीसीएस) अधिक प्रभावीपणे होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासगी क्षेत्राला वारसा जतन आणि संवर्धनात सहभागी करून घेण्याच्या धोरणाला चालना दिली आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्मारके आणि नैसर्गिक परिसंस्थांच्या संरक्षणात ‘टीसीएस’ आणि टीसीएस फाउंडेशन सक्रिय भूमिका
बजावत आहे.


मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रेरणेतून गेल्या दशकात मुंबईतील ऐतिहासिक राजाबाई क्लॉक टॉवर आणि मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालय इमारतीच्या संवर्धन व पुनर्संचयितीकरणाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवण्यात आला आहे.


मुंबईतील १५६ वर्षे जुन्या राजाबाई टॉवरच्या बाह्य प्रकाशव्यवस्थेचे आधुनिकीकरण तसेच ग्रंथालयातील फर्निचर दुरुस्ती व पुनर्स्थापना या कामांना शासनस्तरावर मिळालेल्या पाठबळामुळे गती मिळाली. या प्रकल्पासाठी ‘टीसीएस’ने ८.९० कोटी रुपयांचे योगदान दिले असून, युनेस्कोने २०१८ च्या आशिया-पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारांत या उपक्रमाची दखल घेतली आहे.


मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (सीएसएमव्हीएस) यांच्या संवर्धन व पुनर्संचयितीकरणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. ‘टीसीएस’ने या प्रकल्पासाठी टप्प्याटप्प्याने एकूण २४.७९ कोटी रुपयांचे योगदान दिले. सन २०२२ मध्ये युनेस्कोच्या आशिया-पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारांत ‘अवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ मिळवणारा हा प्रकल्प वास्तुशास्त्रीय व अभियांत्रिकी दृष्टिकोनातून आदर्श ठरला. गेल्या १०० वर्षांतील हे संग्रहालयाचे पहिले मोठे पुनर्संचयितीकरण कार्य ठरले आहे.

Comments
Add Comment

तुरुंगातूनच विजयाचा गुलाल!

गंभीर गुन्ह्यातील उमेदवारांना मतदारांची पसंती मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मशीद, सँडहर्स्ट रोड आणि काही थांबे रद्द मुंबई : मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार?

शरद पवार गटाकडून हालचालींना सुरुवात मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल आल्यानंतर, आता सर्वच राजकीय

मुंबईत ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधणार

महापालिका निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचे निकाल लागले आहेत.

मतदान अधिक, तरीही एमआयएमपेक्षा मनसेच्या जागा कमी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाला मिळालेले यश हा चर्चेचा विषय झाला आहे. या

मुस्लीम मतदारांची मते यापुढेही निर्णायक ठरणार

मुंबई : संपूर्ण राज्यातील महानगरपालिकांमध्ये एआयएमआयएमचे ९५ च्या आसपास नगरसेवक निवडून आले असून त्यात मुंबईतील