मानखुर्दमधून समाजवादी पक्षाचा सफाया, उबाठाला लोकसभेत दिलेला पाठिंबा पडला भारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मानखुर्द विधानसभा क्षेत्रामध्ये समाजवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत उबाठा काँग्रेससह महाविकास आघाडीला दिलेल्या पाठिंब्याचा परिणाम महापालिका निवडणुकीत स्पष्ट दिसून आला. समाजवादी पक्षाला आता मुस्लिमांनी नाकारले आणि ज्या मानखुर्दमधून समाजवादी पक्षाचे पाच नगरसेवक निवडून यायचे तिथे त्यांचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. समाजवादी पक्षाची जागा तिथे एआयएमआयएमने घेतली आहे. या मानखुर्द विधानसभेत ९ पैंकी केवळ सहा नगरसेवक हे एकट्या एमआयएमचे निवडून आले असून भाजप, शिवसेना आणि उबाठा अशाप्रकारे प्रत्येकी एक जागी नगरसेवक निवडून आले. त्यामुळे मानखुर्द आता समाजवादी पक्षाचा गड राहिला नसून समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांचा गडच एमआयएमने खालसा केला आहे. मात्र, या एमआयएमच्या वनात नवनाथ, विठ्ठलासह अपेक्षा या तिन हिंदू नगरसेवक निवडून आले आहेत.


मानखुर्द विधानसभा क्षेत्रात मागील काही वर्षांपासून समाजवादी पक्षाचा गड राहिलेला नसून या विधानसभेतून समाजवादी पक्षाचे चार ते पाच नगरसेवक सातत्याने निवडून येत आहे. मागील निवडणुकीत मानखुर्दमधून ९ पैंकी ५ नगरसेवक निवडून आले होते. परंतु या निवडणुकीत समाजवादी पक्षाला आपला भोपळाही फोडता आलेला नाही. या निवडणुकीत एमआयएमचे तब्बल सहा नगरसेवक निवडून आले आहेत. तर भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन हे प्रभाग १३५मधून, उबाठाचे माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे हे प्रभाग १४१मधून आणि शिवसेनेचे अपेक्षा खांडेकर या प्रभाग १४२मधून निवडून आल्या आहेत. हे तीन नगरसेवक वगळता संपूर्ण मानखुर्द विधानसभेतून एमआयएमचे सहा नगरसेवक निवडून आले.


स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी आणि आमदार रईस शेख यांच्या वादात येथील समाजवादी पक्ष संपलेला आहे. आमदार रईस शेख यांनी अबू आझमी यांनी योग्य उमेदवार दिले नसल्याची तक्रार समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याकडे केली होती. समाजवादी पक्षाच्या या दुहीचा फायदा एमआयएमने उठवला आणि त्यांनी एकाच विधानसभेत सहा नगरसेवक निवडून आणत भविष्यात मानखुर्दमधून एमआयएमचा आमदार निवडून जाणार असल्याचे संकेत दिले आहे.



मानखुर्दमधून विधानसभेतून निवडून आलेले नगरसेवक



  1. प्रभाग क्रमांक १३४: मेहजाबीन अतिक अहमद खान(एमआयएम)

  2. प्रभाग क्रमांक १३५ : नवनाथ बन (भाजप)

  3. प्रभाग क्रमांक १३६:मो. जमीर कुरेशी(एमआयएम)

  4. प्रभाग क्रमांक १३७: पटेल शमीर रमझान(एमआयएम)

  5. प्रभाग क्रमांक १३८:रोशन इरफान शेख (एमआयएम)

  6. प्रभाग क्रमांक १३९:शबाना आतिफ शेख(एमआयएम)

  7. प्रभाग क्रमांक १४०: विजय तातोबा उबाळे(एमआयएम)

  8. प्रभाग क्रमांक १४१:विठ्ठल लोकरे(उबाठा)

  9. प्रभाग क्रमांक १४२: अपेक्षा गोपाळ खांडेकर(शिवसेना)

Comments
Add Comment

मेट्रो स्थानकांपासून थेट घरापर्यंत ९ रुपयात करता येणार वातानुकूलित प्रवास, जाणून घ्या... केव्हा कुठे मिळणार ही सेवा?

मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता स्टेशनबाहेर पडताच सुरू होणारा ऑटो, टॅक्सी मिळवण्यासाठी

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’द्वारे जागतिक पातळीवर भारताच्या विकासगाथेचा गजर मुंबई : महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर

मुंबई–नवी मुंबई प्रवास होणार अधिक स्वस्त; टोलमध्ये ५० टक्के सूट, ई-वाहनांसाठी टोल माफ

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. अटल बिहारी वाजपेयी

वय लहान पण कीर्ती महान; पुण्यातील सई थोपटेनी नगरसेवक बनून रचला इतिहास

Pune Municipal Corporation Election 2026 : सई थोपटे या तरुणीने अतिशय लहान वयात पुणे महानगरपालिकेत मोठं यश मिळवित इतिहास रचला आहे.ती

महापौरपदासाठी पक्षांमध्ये लॉबिंग सुरू.. कोण होणार महापौर?

Municipal Corporation Election Results 2026 : मुंबई, नागपूर, ठाणे, पुणे यांसह राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांमध्ये पारडे कोणाचे जड होणार,

मुंबईचा महापौर कोण होणार? भाजपातील 'या' पाच नावांची रंगते आहे चर्चा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि आता मुंबईला वेध लागलेत ते मुंबईचा महापौर कोण होणार याचे? मुंबईची