महापालिका निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचे निकाल लागले आहेत. त्यात बहुतांश महापालिकेत भाजपने वर्चस्व राखले आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या मदतीने यश मिळाले. राज्यभर विजयाचा उत्साह दिसत आहे. या महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत १० मोठे निर्णय घेण्यात आले. मुंबईतील पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधली जाणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्पास मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासह मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.