रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा तिमाही निकाल जाहीर कंपनीच्या नफ्यात १.७% वाढ तरीही फंडामेंटल मजबूत

मोहित सोमण: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या देशातील सर्वात मोठ्या कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला अथवा समुहाला एकत्रितपणे इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १.७% अधिक करोत्तर नफा मिळाला आहे. गेल्या तिसऱ्या तिमाहीतील डिसेंबरमध्ये कंपनीला २१८०४ कोटीचा नफा मिळाला होता तो वाढत या तिमाहीत २२१६७ कोटी मिळाला आहे. ईबीटा (EBITDA) म्हणजेच कंपनीच्या करपूर्व कमाईत इयर ऑन इयर बेसिसवर ४८००३ कोटीवरून ६.१% वाढ होतत ५०९३२ कोटींवर वाढ प्राप्त झाली आहे. तरीही कंपनीच्या ईबीटा मार्जिनमध्ये ७० बेसिस पूर्णांकाने घसरण झाली असून ते १८ वरून १७.३ वर पोहोचले आहे. उपलब्ध माहितीनुसार, एकत्रित ईबीटा इयर ऑन इयर बेसिसवर ६.१% वाढत ४८०००३ कोटीवरून वाढत ५०९३२ कोटींवर पोहोचला आहे. जिओ कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर १२.७% वाढ झाली आहे. गेल्या तिमाहीतील ३३०७४ कोटी तुलनेत या तिमाहीत ही वाढ ३७२६२ कोटींवर पोहोचली आहे. तर जिओ कंपनीच्या एकूण सबस्क्राईबरची संख्या डिसेंबर महिन्यात इयर ऑन इयर (YoY) ५१५ दशलक्षावर पोहोचली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.


जिओ ५ जी सबस्क्राईबरची संख्या इयर बेसिसवर २५० दशलक्षवर पोहोचली असून ही वाढ १० दशलक्षने झाली असल्याची माहिती कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिली आहे. जिओ कंपनीच्या ईबीटातही १६.४% सुधारणा झाली असून इयर ऑन इयर बेसिसवर ही वाढ १६५७५ कोटीवरून १९३०३ कोटींवर वाढ झाली. जिओ कंपनीच्या करोत्तर नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर ११.२% वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या एआरपीयु (Average Revenue Per User) ५.१% वाढ झाली असून ही वाढ २०३.३ वरून २१३.७ वर झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले.


रिलायन्स रिटेल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तिने आपल्या ९७६०५ कोटींच्या महसुलासह स्थिर कामगिरी केली असल्याचे आकडेवारीत म्हटले. कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर ८.१% वाढ अधिक प्राप्त झाली आहे. कंपनीने याविषयी बोलताना दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत सणासुदीच्या मागणीचे वितरण, आरसीपीएल (RCPL) चे डिमर्जर आणि जीएसटीच्या तर्कसंगतीकरणामुळे महसुलावर परिणाम झाला असल्याचे म्हटले.


रिलायन्स रिटेलचा ईबीटा(EBITDA) ६९१५ कोटी होता, जो इयर ऑन इयर बेसिसवर १.३% अधिक प्राप्त झालं आहे. ईबीटा मार्जिन ८.०% अधिक वाढले असल्याचेही यावेळी कंपनीने म्हटले. कंपनीने रिटेलने ४३१ नवीन स्टोअर्स उघडून आपल्या स्टोअर नेटवर्कचा विस्तार केला, ज्यामुळे एकूण स्टोअर्सची संख्या १९९७९ झाली आणि कार्यान्वित क्षेत्राचे प्रमाण ७८.१ दशलक्ष चौरस फूट झाले असेही कंपनीने यावेळी स्पष्ट केले.


एकूण तिमाहीत व्यवहारांची संख्या ५०० दशलक्षांचा टप्पा ओलांडून या व्यवहारात ४७.६% ची मोठी वाढ झाली आहे असे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले. आकडेवारीनुसार,नोंदणीकृत ग्राहकांची संख्या ३७८ दशलक्षांपर्यंत वाढली, ज्यामुळे रिलायन्स रिटेल देशातील सर्वात पसंतीच्या किरकोळ विक्रेत्यांपैकी एक बनले आहे. जिओमार्टने व्यवसायाच्या बाबतीत तिमाही निकालातील आकडेवारीनुसार, दररोजच्या १.६ दशलक्ष ऑर्डरचा टप्पा ओलांडला आणि सरासरी दैनंदिन ऑर्डरमध्ये तिमाही बेसिसवर ५३% आणि इयर ऑन इयर बेसिसवर ३६०%+ वाढ नोंदवली आहे


O2C बाबतीत रिलायन्सच्या O2C विभागाचा तिमाही महसूल इयर ऑन इयर बेसिसवर डिसेंबरपर्यंत ८.४% वाढून १६२०९५ कोटी ($१८.० अब्ज) झाला असल्याचे एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत कंंपनीने म्हटले. विक्रीसाठीच्या उत्पादनात इयर बेसिसवर १.७% वाढ नोंदवली आहे. उपलब्ध माहितीनुसार, रिलायन्सच्या O2C विभागाचा तिमाही EBITDA इयर ऑन इयर बेसिसवर १४.६% वाढून १६५०७ कोटी ($१.८ अब्ज) झाला. वाहतूक इंधनाच्या क्रॅकमधील मोठी वाढ आणि उच्च सल्फर प्राप्ती यामुळे ही वाढ झाल्याचे निरीक्षण कंपनीने नोंदवले आहे. दरम्यान डाउनस्ट्रीम रासायनिक मार्जिनमधील कमकुवतपणा आणि उच्च फीडस्टॉक मालवाहतूक दरांमुळे काही प्रमाणात ही वाढ मर्यादित राहिली असेही स्पष्टीकरण कंपनीने यावेळी दिले. अनुकूल इथेन क्रॅकिंग अर्थशास्त्र आणि देशांतर्गत बाजारपेठेतील विक्रीमुळे नफ्याला आधार मिळाला.


इयर ऑन इयर बेसिसवर तेल आणि वायू विभागाचा या तिमाहीतील महसूल वार्षिक तुलनेत ८.४% नी कमी होऊन ५८३३ कोटी ($६४९ दशलक्ष) झाला असे कंपनीने आकडेवारीत स्पष्ट केले. कंपनीच्या मते याचे मुख्य कारण KGD6 वायू आणि कंडेन्सेटच्या कमी विक्रीचे प्रमाण आणि कमी किंमत प्राप्ती हे होते.एकीकडे कमी महसूल आणि देखभालीच्या कामांमुळे वाढलेल्या परिचालन खर्चामुळे, तेल आणि वायू विभागाचा तिमाही ईबीटा(EBITDA) इयर बेसिसवर तुलनेत १२.७% नी घसरून ४८५७ कोटी झाला.


उपलब्ध माहितीनुसार, या व्यवसायात आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी सरासरी KGD6 उत्पादन २६.१ MMSCMD वायू आणि १८७४६ बॅरल/दिवस तेल/कंडेन्सेट होते. सध्याचा उत्पादनाचा दर सुमारे २६.१ MMSCMD वायू आणि सुमारे १८४०० बॅरल/दिवस तेल/कंडेन्सेट आहे.


जिओस्टारने आपल्या प्रमुख प्लॅटफॉर्म आणि विभागांमध्ये नेतृत्व कायम ठेवत आपली मजबूत कामगिरी सुरू ठेवली आहे. जिओस्टारने ८०१० कोटींचा मजबूत महसूल आणि १३०३ कोटींचा EBITDA (इतर उत्पन्नासह) नोंदवला आहे. दूरचित्रवाणी नेटवर्क ८३० दशलक्षाहून अधिक दर्शकांपर्यंत पोहोचले, ज्यांनी ६० अब्ज तासांपेक्षा जास्त पाहण्याचा वेळ दिला. जिओहॉटस्टारचे सरासरी ४५० दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्ते (MAUs) होते; जे तिमाही बेसिसवर (QoQ)१३% नी वाढले असून आयपीएल तिमाहीच्या (आर्थिक वर्ष २६ ची पहिली तिमाही) जवळपास होते जे प्लॅटफॉर्मची गती स्पष्टपणे दर्शवते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नेटवर्कचा टीव्ही मनोरंजन दर्शकसंख्येतील वाटा वार्षिक तुलनेत १०० bps नी सुधारून ३४.६% झाला आहे.


एकूणच निकालावर आपली प्रतिक्रिया नोंदवताना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले आहेत की,'आर्थिक वर्ष २६ मध्ये सर्व व्यवसायांमध्ये सातत्यपूर्ण आर्थिक कामगिरी आणि कार्यात्मक लवचिकता (Flexibility) दिसून आली. उत्पादनांद्वारे आम्ही मोबाईल फोन, घरे, उपकरणे आणि उद्योगांना जोडत आहोत. आमच्या कनेक्टिव्हिटी आणि मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे प्रदान केलेल्या समन्वित मूल्यामुळे ग्राहकांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. या तिमाहीत जिओने भारतीय बाजारपेठांसाठी तयार केलेल्या सर्वसमावेशक, स्वदेशी तंत्रज्ञान स्टॅकद्वारे सक्षम केलेल्या आकर्षक प्रस्तावांद्वारे आपला ग्राहकवर्ग आणखी वाढवला. या व्यवसायाने ईबीटा (EBITDA) मध्ये १६.४% वाढीसह मजबूत आर्थिक कामगिरी केली.


आमच्या रिटेल व्यवसायासाठी देखील ही तिमाही महत्त्वपूर्ण ठरली, ज्यात नवीन ब्रँड्स आणि उत्पादन श्रेणींचा समावेश करून पोर्टफोलिओ अधिक मजबूत करण्यात आला. ग्राहक उत्पादने व्यवसायाचे विभाजन या तिमाहीत लागू झाले. क्लासिक भारतीय ब्रँड्सपासून ते नवीन युगातील लेबल्सपर्यंतच्या विस्तृत आणि वैविध्यपूर्ण उत्पादन श्रेणीसह, ग्राहक उत्पादने विभाग एका केंद्रित संघटनात्मक संरचनेद्वारे आपल्या वेगवान वाढीच्या मार्गावर प्रगती करत आहे.


देशभरातील आमची सखोल, ओम्नी-चॅनल उपस्थिती आणि हायपरलोकल जलद डिलिव्हरीमधील मजबूत प्रतिसादामुळे रिटेल व्यवसायाने लवचिक कामगिरी केली. अनुकूल मागणी-पुरवठा गतीशीलतेसह, लक्षणीयरीत्या जास्त इंधन मार्जिन आणि कार्यात्मक लवचिकतेमुळे O2C व्यवसायात मजबूत वाढ झाली. जिओ-बीपी नेटवर्कच्या सततच्या विस्तारासह, आमच्या इंधन किरकोळ विक्री व्यवसायातील मजबूत वाढ अधोरेखित करताना मला आनंद होत आहे. कमी प्रमाण आणि किमतींमुळे अपस्ट्रीम विभागाच्या ईबीटा (EBITDA) वर परिणाम झाला. रिलायन्स एआय आणि नवीन ऊर्जा क्षेत्रातील आपल्या उपक्रमांसह मूल्य निर्मितीच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे. मला विश्वास आहे की रिलायन्स या युगांतकारी तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीमध्ये अग्रणी भूमिका बजावेल आणि भारत व जगासाठी मोठ्या प्रमाणावर शाश्वत उपाय प्रदान करेल.'


काल तिमाही निकालापूर्वी कंपनीचा शेअर ०.१५% उसळत १४६१ रूपये प्रति शेअरवर बंद झाला होता. गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ०.१७% वाढ झाली असून गेल्या महिनाभरात मात्र कंपनीच्या शेअर्समध्ये ५.४०% घसरण झाली आहे तर वर्षभरात शेअर्समध्ये १२.१८% वाढ झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) ७.२७% घसरण झाली आहे.

Comments
Add Comment

१ फेब्रुवारीपासून व्यसन ठरणार महाग! तंबाखू व सिगारेट किंमतीत मोठी वाढ होणार

प्रतिनिधी: अनेकांच्या जीवनात सिगारेटचे महत्व अनन्यसाधारण असते. सध्या व्यसनाधीनता वाढत असताना दुसरीकडे मात्र

सरकारकडून आणखी २४२ गेमिंग बेटिंग ॲपवर बंदी जाहीर

प्रतिनिधी: केंद्र सरकारने ऑनलाईन जुगार व धोकादायक बेटिंग इंस्टंट मनी संबंधित २४२ ॲपवर प्रतिबंध घातला आहे.

विप्रो कंपनीचा तिमाही निकाल कमकुवत? ७% नफ्यात घसरण तरीही 'इतका' लाभांश जाहीर

मोहित सोमण: प्रसिद्ध आयटी कंपनी विप्रो (Wipro Limited) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला तिसऱ्या तिमाहीत

BMC Election 2026 : महापालिका रणसंग्राम: 'महायुती'चा ऐतिहासिक विजय; भाजपची राज्यात मुसंडी!

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निकालांनी राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. 'मिशन महापालिका'

Raj Thackeray : राज ठाकरेंचे मतदारांना पत्र, पत्रातील भाषेवरुन भाजपची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध

महाराष्ट्र भाजपचा! २९ पैकी २५ महापालिकांवर भाजप महायुतीचा झेंडा

मतदारांचा विकासाला कौल; ठाकरे बंधूंसह पवार काका-पुतण्याला दणका मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील २९ महापालिकांच्या