BMC Election 2026 : महापालिका रणसंग्राम: 'महायुती'चा ऐतिहासिक विजय; भाजपची राज्यात मुसंडी!

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निकालांनी राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. 'मिशन महापालिका' यशस्वी करत भाजप-शिवसेना महायुतीने राज्यातील २९ पैकी तब्बल १९ महानगरपालिकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकून 'मोठा भाऊ' म्हणून आपले स्थान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.



भाजप आणि शिवसेना जागांचे संपूर्ण गणित


Municipal Corporations final party wise position

राज्यातील एकूण २,८६८ जागांपैकी महायुतीने बहुतांश जागा खिशात घातल्या आहेत:


भारतीय जनता पक्ष (BJP) : भाजपने संपूर्ण राज्यात १,४०० पेक्षा जास्त जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.


शिवसेना : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यात ३५० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे.


एकूण महायुती: या दोन्ही पक्षांच्या एकत्रित बळावर महायुतीने राज्याच्या शहरी भागावर आपले पूर्ण नियंत्रण मिळवले आहे.



मुंबई महानगरपालिका (BMC) : २५ वर्षांचे सत्तांतर


सर्वात मोठी लढाई मुंबईत होती, जिथे महायुतीने ११४ चा बहुमताचा आकडा पार करत ११८ जागा जिंकल्या आहेत:


भाजप : ८९ जागा (मुंबईतील सर्वात मोठा पक्ष).


शिवसेना : २९ जागा. (याउलट ठाकरे गटाला ६५ आणि मनसेला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे).



१९ शहरांत भाजपचाच महापौर बसणार


राजकीय वर्चस्वाची नवी व्याख्या राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेले यश हे केवळ जागांच्या संख्येपुरते मर्यादित नसून, सत्तेच्या चाव्या स्वतःकडे ठेवण्यात भाजपला मोठे यश मिळाले आहे. एकूण २९ पैकी तब्बल १९ महानगरपालिकांमध्ये भाजपचाच महापौर बसण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपला मिळालेले हे निर्विवाद बहुमत हे सिद्ध करते की, राज्यातील शहरी मतदारांनी विकास आणि पारदर्शक प्रशासनाच्या मुद्द्यावर भाजपला कौल दिला आहे. सर्वात महत्त्वाची लढाई मुंबई महानगरपालिकेत होती. तिथे ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, मित्रपक्षांच्या मदतीने मुंबईत प्रथमच भाजपचा महापौर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईसोबतच पुणे, नागपूर आणि नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांत भाजपने आपल्या बळावर स्पष्ट बहुमत मिळवल्याने तिथेही भाजपचीच सत्ता असणार आहे. १९ महापालिकांमध्ये स्वबळावर किंवा मित्रपक्षांच्या भक्कम पाठिंब्याने भाजपचेच महापौर बसणार असल्याने राज्यातील प्रमुख नागरी प्रशासनावर भाजपची पकड मजबूत होणार आहे. ज्या महापालिकांमध्ये शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी एकत्र लढण्याचा प्रयत्न केला, तिथेही भाजपच्या झंझावातापुढे त्यांचे गणित टिकू शकले नाही. १९ शहरांत भाजपचा महापौर होणे म्हणजे राज्याच्या ७० टक्क्यांहून अधिक नागरी भागाचे नियंत्रण थेट भाजपकडे जाणे होय.



'या' ठिकाणी बसणार भाजपचा महापौर


मुंबई, नवी मुंबई, उल्हासगर, मिरा भाईंदर, पनवेल, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सांगली, संभाजीनगर, नांदेड, अमरावती, अकोला, नागपूर, इचलकरंजी, जालना

Comments
Add Comment

जन्म नोंदणी आणि प्रमाणपत्र विषयक कार्यवाहीचा महापौर घेणार दर महिन्याला आढावा

मुंबई: जन्म नोंदणी करून त्याचे प्रमाणपत्र देणे, हा फक्त शासकीय दस्तावेज देण्यापुरता मर्यादित विषय नसून त्याचाच

उपमहापौरांची कुपर रुग्णालयाला भेट; स्वच्छता आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर दिले कारवाईचे आदेश

मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अवघ्या पाच दिवसांपूर्वी विलेपार्ले येथील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय येथे

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी

मुंबई : राज्य सरकारने बुधवारी प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले असून, तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे

'अकारी पडीत जमीनी शेतकऱ्यांना मिळाव्यात हीच माझी भूमिका'

मुंबई: काॅग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे आरोप अतिशय बिनबुडाचे असून,त्यांनी उपस्थित केलेल्या माहीतीशी