मुंबईत महायुतीचाच महापौर

मुंबईरांनी ठाकरेंना नाकारले, भाजप आणि शिवसेनेला स्वीकारले


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेवर कुणाचा महापौर बसणार याबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता मतपेटींतून आलेल्या निकालाने पूर्णविराम दिला आहे. मुंबईकरांनी ठाकरे ब्रॅण्डला नाकारत विकासाच्या मुद्द्यावर मत मागणाऱ्या भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. मुंबईत भाजपचे तब्बल ८८ नगरसेवक निवडून आले असून शिवसेनेचे २८. या प्रकारे महायुतीचे एकूण ११६ नगरसेवक निवडून आले आहेत. तर मागील २५ वर्षांपासून सत्ता भोगणाऱ्या उबाठाला मुंबईकरांनी सत्ते बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांचे केवळ ६५ नगरसेवक निवडून आले असून मनसेचे केवळ ६ नगरसेवक निवडून आले आहे. त्यामुळे ठाकरेंच्या बंधूंच्या युतीला केवळ ७१ जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या ११४ च्या मॅजिक आकडा पार करण्यात महायुतीला यश आले आहे. त्यामुळे महायुतीचा महापौर रोखण्यापासून भाजप आणि शिवसेनेला कोणीच रोखून शकत नसल्याचे निकालाने दाखवून दिले आहे. त्यामुळे मुंबई ठाकरेंची नसून भाजप आणि शिवसेना महायुतीचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.


मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे १३७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते, त्यापैंकी ८८ उमेदवार हे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने ९० जागा लढवल्या होत्या, त्यात त्यांचे २८ नगरसेवक निवडून आले आहेत. तर महायुतीचा घटक असलेल्या परंतु स्वतंत्र निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे सरकारमधील महायुतीतील घटक पक्षांच्या नगरसेवकांची सख्या ११९ एवढी होणार आहे. त्यामुळे ११४च्या मॅजिकच्या आकड्याच्या पुढे निघून गेल्यामुळे महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला जाऊन महायुतीचाच महापौर बनणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत महापालिकेत १९९७ पासून सलग शिवसेनेची सत्ता असून मागील २५ वर्षे असणाऱ्या उबाठाला आता विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे.


मागील निवडणुकीत भाजपचे ८२ तर उबाठाचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. त्या तुलनेत यंदा भाजपने सहा जागा अधिक मिळवल्या आहेत, तर उबाठाला १९ जागा कमी मिळवता आलेल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना सोंबत घेऊन दोन्ही भाऊ एकत्र येऊनही मुंबईत करिश्मा दाखवून शकले नाही. मुंबईत मराठीचा मुद्दा आणि ठाकरे ब्रँड चाललच नसल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.


शिवसेनेचा पहिला महापौर १९७१ - ७२ मध्ये हेमचंद्र गुप्ते यांच्या रूपात झाले होते. त्यानंतरपासून १९९२ पर्यंत अधूनमधून शिवसेनेचे महापौर निवडून येते होते. त्यानंतर १९९२ ते १९९६मध्ये काँग्रेसचे महापौर बनले होते. या पाच वर्षांच्या शेवटच्या काळात काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे तत्कालिन शिवसेनेचे उमेदवार मिलिंद वैद्य हे महापौर म्हणून निवडून आले होते. त्यानंर १९९७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालिन शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आले आणि तेव्हापासून महापालिकेत उबाठाचा महापौर निवडून येत आहे. आता २०२६ मध्ये मुंबईच्या ७८ व्या महापौरांची निवड होणार आहे. मुंबईचा हा ७८वा महापौर आता भाजप महायुतीचा होणार आहे, त्यानुसार नगरसेवक गणसंख्येची गणितेही जुळून येत आहेत.


निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर प्रथमपासून भाजप पुढे राहिला होता आणि त्यानंतरही शेवटपर्यंत त्यांचे नगरसेवक अधिक निवडून येत पुढेच राहिले. त्यामुळे भाजपचे अंतिम निकालानंतर ८८ नगरसेवक निवडून आले, तर शिवसेनेचे २८ नगरसेवक निवडून आले. दुपारनंतर मॅजिक आकड्याच्या पुढे नगरसेवक निवडून आल्यांनतर भाजपच्या पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू झाला तर उबाठा शिवसेनेच्या शिवसेना भवनजवळ गुलाल उधळला गेला; परंतु तेथील गड जिंकल्यामुळे जल्लोष झाल्याचे पाहायला मिळाले होते. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने विकासाचा मुद्दा पुढे नेत प्रचार केला होता, तर उबाठा आणि मनसेने केवळ मराठी अस्मितेला हात घालत मराठी आणि अमराठी मुद्दा हाती घेत प्रचार केला होता. त्यामुळे मुंबईकरांनी ठाकरे बंधूंच्या भावनिक मुद्द्याकडे लक्ष न घालता विकासाच्या मुद्यावर महायुतीला मतदान केल्याचे दिसून येत आहे.


संख्याबळ पक्षनिहाय


भाजप : ८८(मागील निवडणुकीतील संख्या : ८२)
शिवसेना २८(मागील निवडणुकीतील संख्या : 00)
उबाठा : ६५(मागील निवडणुकीतील संख्या : ८४)
मनसे :०६ (मागील निवडणुकीतील संख्या : ०७)
काँग्रेस : २४ (मागील निवडणुकीतील संख्या : ३१)
एमआयएम : ०८ ((मागील निवडणुकीतील संख्या : ०२)
राष्ट्रवादी काँग्रेस : ०३ ((मागील निवडणुकीतील संख्या : ०७)
राष्ट्रवादी काँग्रेस शप : ०१ ((मागील निवडणुकीतील संख्या : ००)
अपक्ष : ०२

Comments
Add Comment

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.

Raj Thackeray : राज ठाकरेंचे मतदारांना पत्र, पत्रातील भाषेवरुन भाजपची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध

सांगलीत भाजप बहूमताच्या उंबरठ्यावर अडखळली

एका जागेसाठी देणार शिवसेनेला उपमहापौर मुंबई : महायुतीत फाटाफूट झालेली, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची

परभणीत मशाल पेटली, नांडेमध्ये कमळ फुलले

मुंबई : महापालिका निवडणुकीत सर्वत्र सत्ताधारी पक्षांचा बोलबाला दिसत असताना येथे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

मुंबई महापालिका निवडणूक निकालात काय घडले?

नार्वेकरांनी तिन्ही गड राखले मुंबई : कुलाबा विधानसभेत भाजपच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर

उबाठा पहिल्यांदा बसणार मुंबईत विरोधी पक्षात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मागील २५