मोहित सोमण: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळखली जाणारी एचडीएफसी बँक (HDFC Bank) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. बँकेच्या असेट क्वालिटीत सुधारणा झाली असताना बँकेच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ११% अधिक निव्वळ नफा (Net Profit) प्राप्त झाला आहे. बँकेच्या एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेच्या निव्वळ नफ्यात गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या १६७३५ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये १८६५३ कोटींवर वाढ झाली आहे. बँकेच्या माहितीनुसार, बँकेच्या एकूण उत्पन्नात (Total Income) इयर ऑन इयर बेसिसवर ८७४६०.४४ कोटी तुलनेत ९०००५.०० कोटींवर वाढ झाली आहे. बँकेच्या करपूर्व नफ्यात (Profit before tax PBT) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील २१८४६.५५ कोटी तुलनेत या तिमाहीत २४२५९.९४ कोटीवर वाढ झाली आहे.
निकालानुसार, बेसिक ईपीएस (Earnings per share EPS) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १०.९५ रूपये तुलनेत या तिमाहीत १२.१३ रूपयांवर वाढले. मात्र यंदा बँकेच्या निव्वळ एनपीए (Net Non Performing Assets NPA) इयर ऑन इयर बेसिसवर ११५८७.५४ कोटी तुलनेत या तिमाहीत ११९८१.७५ कोटींवर वाढ झाली आहे. आरओई (Return on Assets) ०.४७ वरून ०.४८ रूपयांवर वाढ झाली आहे. तर डेट टू इक्विटी गुणोत्तर (Ratio) ०.८४ वरून ०.४९% वर घसरला आहे. तिमाही बेसिस वर निव्वळ एनपीएत कुठलाही बदल झालेला नसून ते ०.४२ वर कायम आहे. बँकेच्या प्रोविजनिंग मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १०% घसरण झाल्याने ३१५४ कोटी वरून २८३८ कोटींवर घसरले आहे.