शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी- सेबीकडून निर्णय इक्विटी कॅश सेगमेंट सत्रात CAC लागू होणार!

मोहित सोमण: सेबी (Security Exchange Board of India SEBI) या बाजार नियामक मंडळाने आलेल्या कन्सल्टेशन पेपरचा विचार करून शेअर बाजारात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लवकरच शेअर बाजारात सीएएस (Closing Auction Session) हे सत्र बाजाराच्या अंतिम सत्र बंद होताना शेवटाला होणार आहे. माहितीनुसार, इक्विटी कॅश सेगमेंट व्यवहारात या नव्या पद्धतीची अंमलबजावणी होणार आहे. गुंतवणूकदारांनी पारदर्शकता अधिक प्रमाणात प्राप्त होण्यासाठी व अस्थिरतेत गुंतवणूकदारांना विविध प्रकारचे एक्स्पोजर स्थैर्यासह एका विशिष्ट रकमेला ट्रेडिंग करण्याची मुभा हे सत्र देऊ शकते. यापूर्वी बंद होताना शेअरची किंमत अखेरच्या अर्ध्या तासातील व्हॉल्यूमवर आधारित असते द्याला बाजारात वीडब्लूएपी (Volume Weighted Auction Session CAS) प्रमाणे होतात. जगभरातील शेअर बाजारात आता सीएएस प्रणालीत अंतिम शेअरची किंमत निश्चित केली जाते. बाजारातील तरलता वाढवून एक समान संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे.


या पद्धतीने गुंतवणूकदारांना डेरिएटिव, इंडेक्स मोजणीसाठी व एनएवी (Net Asset Value NAV) शोधण्यासाठी मदत होते. ५ डिसेंबर २०२४ व व २२ ऑगस्ट २०२५ परिपत्रकानुसार गुंतवणूकदारांकडून याविषयी अभिप्राय मागविण्यात आले होते. सीएएस (CAS) टप्प्याटप्प्याने लागू केले जाई असे सेबीने सांगितले आहे. सुरुवातीला, कॅश सेगमेंटमधील ज्या शेअर्सवर डेरिव्हेटिव्ह करार उपलब्ध आहेत त्यांची अंतिम किंमत सीएएसवर आधारित निश्चित केली जाईल. तसेच कॅश सेगमेंटमधील उर्वरित सिक्युरिटीजची अंतिम किंमत, कॅश सेगमेंटमधील सीटीएसच्या शेवटच्या ३० मिनिटांत झालेल्या व्यवहारांच्या VWAP (व्हॉल्यूम वेटेड एव्हरेज प्राईस) वर आधारित निश्चित केली जाईल असे सेबीने म्हटले आहे. सीएएस सर्व ट्रेडिंग दिवसांवर दुपारी ३:१५ ते ३:३५ या वेळेत २० मिनिटांच्या स्वतंत्र सत्राच्या स्वरूपात लागू केले जाईल.


ऑर्डर एंट्री सत्र दुपारी ३:२८ ते ३:३० या वेळेत कधीही बंद होईल जे प्रणालीद्वारे नियंत्रित असेल असे सेबीने म्हटले. याशिवाय इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट सर्व ट्रेडिंग दिवसांवर दुपारी ३:४० पर्यंत कार्यरत राहणार असून कॅश सेगमेंटमधील पोस्ट-(क्लोज) सत्र दुपारी ३:५० ते ४:०० या वेळेत कार्यरत राहील, जिथे शेअर्सच्या अंतिम किमतीवर व्यवहार केले जातील.


सीएएसची प्रणाली अथवा फ्रेमवर्क ३ ऑगस्ट २०२६ पासून कॅश सेगमेंटमध्ये लागू केली जाईल. नमूद केलेले प्री ओपन ऑक्शन सत्राच्या चौकटीतील बदल ७ सप्टेंबर २०२६ पासून लागू केले जातील असेही सेबीने म्हटले. सेबीच्या सल्ल्याने, परिपत्रकाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत संयुक्तपणे एसओपी (Standard operating procedure SOPs) तयार केल्या जातील. उपलब्ध माहितीनुसार, स्टॉक एक्सचेंज सीएएससाठी आणि सीएएससाठी संदर्भ किंमत (Reference Price) निश्चित करण्याच्या कालावधीसाठी बाजारावरील देखरेख मजबूत करण्यासाठी आवश्यक प्रणाली तयार करतील असे सेबीने अंतिमतः म्हटले आहे.

Comments
Add Comment

Iran-US War :ट्रम्प प्रशासनासमोर आर्थिक आव्हान; इराणसह युद्धासाठी नव्या निधीची गरज

Iran-US War : इराण-अमेरिका युद्ध (Iran-US War) पुन्हा तीव्र होत असताना अमेरिकेच्या संरक्षण खर्चात (Defense Spending) मोठी वाढ झाली आहे.

Mumbai Rain : मुंबईकरांनो सावधान! आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

मुंबई : मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून बुधवारी (२३ जुलै) पावसाची

Maharashtra CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार... मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी लिहिलेलं पत्र

Good Hair : केस गळतायत? मग आहारात नक्की समाविष्ट करा 'हे' ८ पदार्थ; केस होतील मजबूत आणि दाट

मुंबई : बदलती जीवनशैली, ताणतणाव, प्रदूषण आणि अयोग्य आहार यामुळे केस गळणे, केस पातळ होणे आणि अकाली पांढरे होणे या

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

Crime News : सिंगापूरमध्ये बनावट हिऱ्याच्या मदतीने 2 लाख डॉलरच्या हिऱ्याची चोरी; दोन भारतीयांना अटक

नवी दिल्ली : सिंगापूरच्या चायनाटाउनमधील एका दागिन्यांच्या दुकानातून सुमारे 2 लाख सिंगापूर डॉलर (1.54 लाख अमेरिकी