भाजप एका जागेवरून ४३ जागांवर

बहुजन विकास आघाडीच्या ३७ जागा घटल्या


विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने ७० जागा जिंकल्या आहेत आणि स्पष्ट बहुमत मिळविले आहे, तर भारतीय जनता पक्ष हा ४३ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. सन २०१५ च्या निवडणुकीचा विचार करता भाजपच्या तब्बल ४३ जागा वाढल्या असून, बहुजन विकास आघाडीच्या मात्र ३७ जागा घटल्या आहेत. त्यामुळे भाजप हा पक्ष सत्तेच्या जवळ गेला नसला तरी त्यांनी चांगलीच मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे.


यापूर्वी दोन निवडणुका पार पडल्या आहेत. दोन्ही निवडणुकांमध्ये येथे बहुजन विकास आघाडीची सत्ता राहिली आहे. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत, तर ११५ जागांपैकी १०७ जागांवर बहुजन विकास आघाडीने विजय मिळवून महापालिकेत त्यांचे एकहा ती वर्चस्व असल्याचे सिद्ध केले. दरम्यान, सन २०२० मध्ये महापालिकेची मुदत संपल्यानंतर निवडणुका झाल्या नाही. मात्र गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या हातून बोईसर, वसई आणि नालासोपारा हे तीनही मतदारसंघ गेले. त्यामुळे यावेळी होत असलेली महापालिकेची निवडणूक बहुजन विकास आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई ठरली होती. अशातच निवडणुकीच्या तोंडावर काही माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बहुजन विकास आघाडीची साथ सोडली. मात्र वसई विरार मधील मतदारांनी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची साथ सोडली नाही. आणि या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला महापालिकेच्या सभागृहात सत्तास्थापन करण्यासाठी बहुमत मिळवून दिले. तर दुसरीकडे पालघर लोकसभा, पाच विधानसभा आणि नुकताच झालेल्या नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना यांनी आगरी सेना, श्रमजीवीला सोबत घेऊन महायुती म्हणून ही निवडणूक लढविली. शिवसेनेला २७ पैकी केवळ एक जागा निवडून आणता आली, तर भाजपचे ९३ उमेदवारांपैकी ४३ उमेदवार विजयी झाले आहेत. परिणामी गेल्या महापालिका निवडणुकीत केवळ एक जागा निवडून आलेल्या भाजपने यावेळी तब्बल ४३ जागा जिंकल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


वसई-विरारकरांनी दिलेला कौल मान्य आहे. भाजपचे तळागाळातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी चांगली मेहनत घेतली. त्यामुळे ४२ जागा जिंकता आल्या आहेत. विरोधकांनी मतदारांमध्ये विविध प्रकारचा अपप्रचार केल्याने काही जागांवर फटका बसला आहे. माझ्यासह भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता नगरसेवक नाही तर सेवक म्हणून वसई-विरारमध्ये सेवा करत राहील.
- डॉ. हेमंत सवरा, खासदार पालघर.

Comments
Add Comment

वसई-विरारमधील विजयी उमेदवार

१ अ बविआ जयंत बसवंत १ ब बविआ अस्मिता पाटील १ क बविआ सुनंदा पाटील १ ड बविआ सदानंद पाटील   २ अ भाजप रिना वाघ २ ब

माजी नगरसेवकांच्या कोलांट उड्या ठरल्या फायद्याच्या

विरार : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडी मधून काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश

वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच ‘धुरंधर’

महापालिकेच्या सभागृहात केली हॅटट्रिक गणेश पाटील विरार : गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा हादरा

बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत, महापालिकेवर पुन्हा सत्ता

विरार :- वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या निकालात बहुजन विकास आघाडीने (बविआ) दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान