शिवसेनेच्या उमेदवाराचा भाजपने केला पराभव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शिव कोळीवाडा विधानसभेतील प्रभाग क्रमांक १७३मध्ये महायुतीमध्ये शिवसेनेच्या पुजा रामदास कांबळे यांना अधिकृत उमेदवारी दिली असली तरी या प्रभागातून भाजपने डमी उमेदवार उभ्या केलेल्या शिल्पा केळसकर यांनी माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा आणि उबाठा शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रणिती वाघधरे यांचा पराभव केला. केळुसकर यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली होती. परंतु कमळ चिन्हाचा ए बी फॉर्म बोगस असल्याने भाजपाने त्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. परंतु या तक्रारीनंतरही केळुसकर यांना भाजपाच्या ए बी फॉमवरील अर्ज पात्र ठरवल्याने त्यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवली आणि त्यांनी भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाला अपेक्षित असा विजय मिळवला.

मलिक कुटुंबात आधी खुशी आधा गम


महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६५ मधून कप्तान मलिक, प्रभाग क्रमांक १६९मधून बुशरा मलिक आणि प्रभाग क्रमांक १६८मधून डॉ सईदा खान हे माजी मंत्री आणि माजी आमदार नबाव मलिक तसेच विद्यमान आमदार सना मलिक यांच्या कुटुंबातील सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवडणूक रिंगणात उभे होते. यातील कप्तान मलिक यांचा पराभव झाला असून डॉ सईदा खान आणि बुशरा मलिका यांचा विजय झाला आहे. त्यामुळे मलिका कुटुंबात आधी खुशी आधा गम अशीच परिस्थिती आहे.

समाधान सरवणकर यांचा निसटता पराभव


दादर माहिम विधानसभेतील प्रभाग क्रमांक १९५ मधून शिवसेनेचे समाधान सरवणकर यांचा उबाठाचे निशिकांत शिंदे यांनी पराभव करत ते जाईंट किलर ठरले. १९५ची जागा उबाठाने मनसेला न सोडल्यामुळे मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच उबाठाचे पदाधिकारीही प्रचारापासून दूर राहिले होते. त्यामुळे निशिकांत शिंदे हे बाहेरील उमेदवार असल्याने याचा समाधान सरवणकर यांचा विजय सुकर मानला जात होता. परंतु शेवटच्या क्षणाला गेम फिरला आणि समाधान सरवणकर यांचा निसटता पराभव झाला. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत समाधान सरवणकर यांचा निसटता विजय झाला होता,यावेळी निसटता पराभव झाला आहे.
Comments
Add Comment

Prithviraj Chavan : पृथ्वीराज चौहाण यांची उपायुक्तपदी बढती, तर सहायक आयुक्तपदावरील आठ अधिकाऱ्यांची खांदेपालट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त डॉ पृथ्वीराज चौहाण यांची उपायुक्त

Devendra Fadnavis : कुंभमेळ्याआधी शिर्डी विमानतळावरील एअर कार्गो सुविधा सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पुरंदर विमानतळासाठी ६ हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी मुंबई : नवी मुंबई

Shambhuraj Desai : कोयना बॅक वॉटर फेस्टिव्हल २०२६ होणार जागतिक दर्जाचा; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्राच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने कोयना बॅक वॉटर

Chandrashekhar Bawankule : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठी पालघरमधील जमीन देण्याचा निर्णय

मुंबई : फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका' प्रकल्पाच्या कामाला गती

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांनी घेतला वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याचा आढावा

मुंबई : पालघर जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त सहभागातून विकसित होत असलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी

Cashless Petrocard : राज्यातील रुग्णवाहिकांसाठी आता 'कॅशलेस पेट्रोकार्ड'

- आरोग्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन; इंधनाच्या कारणांवरून होणारे रुग्णांचे हाल थांबणार मुंबई : "राज्यातील आरोग्य