सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणूक निकालात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या प्रभाग क्रमांक २३ मध्ये भाजपने महाविकास आघाडीचा सुफडा साफ करत मोठा विजय मिळवला आहे. या प्रभागात भाजपच्या पॅनलने भरघोस मतांनी विजय संपादन मिळवला आहे. राजकीय वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे. खासदार प्रणिती शिंदे यांचे जुने घर ‘जाई-जुई’ हे सोलापूर–विजापूर महामार्गावर असून, ते याच प्रभागात येते. त्यामुळे हा प्रभाग काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा मानला जात होता. या प्रभागात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली.
महाविकास आघाडीच्या वतीने दीपाली शहा (काँग्रेस), अलका राठोड (उबाठा), लक्ष्मण जाधव (उबाठा) आणि सुनीता रोटे (राशप) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र मतमोजणीअंती भाजपच्या पॅनलने सर्व उमेदवारांचा पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. खासदार प्रणिती शिंदे राहत असलेल्या प्रभागातच भाजपचा असा मोठा विजय झाल्याने काँग्रेस आणि महाविकास आघाडीला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या निकालामुळे आगामी राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रभाग १९ भाजप विजयी
1)कविता जंगम अ (ओबीसी महिला)
2)व्यंकटेश कोंडी ब (ओबीसी)
3)कलावती गडगे क (सर्वसाधारण महिला)
4)बसवराज केंगनाळकर ड (सर्वसाधारण)
प्रभाग २३ भाजप विजयी
१)सत्यजित वाघमोडे-अ (अनुसूचित जाती)
२)आरती वाकसे-ब (ओबीसी महिला)
३)ज्ञानेश्वरी देवकर-क (सर्वसाधारण महिला)
४)राजशेखर पाटील-ड (सर्वसाधारण)