आधी प्रपंच करावा नेटका
आधी प्रपंच कराना नेटका। मग घ्यावे परमार्थ विवेका।
येथे आळस करू नका ।
विवेकी हो ।। दासबोधः दशक १२ समास १
समर्थ रामदास हे विरक्त संत होते. परमेश्वराच्या अपार ओढीने त्यांनी घराचा त्याग केला. ते राष्ट्रद्रष्टे होते. लोकशिक्षक होते. परकी जुलमी सत्ता अस्तंगत होऊन वा भूमीवर रामराज्यासारखे आदर्श शासन यावे यासाठी त्यांनी लोकजागृती केली. परक्या सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची लोकांना प्रेरणा दिली. त्यांच्या मनात राष्ट्रधर्माची भावना चेतवली.
समर्थाचा दासबोध हे मानवी जीवनावरचे प्रभावी भाष्य आहे. जीवनाच्या विविध अंगांच्या अनुभवांची शिकवण त्यात आहे. समर्थांनी सर्वसामान्य माणसाला मानवी जीवनाचे सार उलगडून दाखविले. आपला संसार न सोडता, नित्य कर्तव्ये पार पाडत विवेकाच्या वाटेने कसे जावे याची शिकवण त्यांनी लोकांना दिली.
आपला प्रपंच नीटपणे सांभाळावा. अविचार, लेभ, मोह, अशा रिपुंच्या मार्गाने लोक जातात आणि संकटाची, दुःखांची मालिका सुरू होते. परिवाराचे नियोजन न केल्यामुळे आयुष्यात दैन्यवस्था येते. 'छोटे कुटुंब हेच सुखी कुटुंब, ही शिकवण समर्थांनी त्या काळात दिली. अतिरिक्त मोठ्या कुटुंबामुळे आर्थिक गणित बिघडून जाते. अशा घरात लक्ष्मीही थांबत नाही. मुलंबाळ उपाशी राहतात. मग हातात भिकेचा कटोरा घेऊन फिरतात. म्हणून आपल्या उत्पन्नाप्रमाणे घराचे, कुटुंबाचे नियोजन करावे, असे म्हटले आहे.
लोक पूजापाठ, तीर्थयात्रा, ग्रंथपठण, गंगास्नान असे सारे बाह्य उपचार करतात. त्यातच मग्न राहून खऱ्या कर्तव्याकडे पाठ फिरवतात. अशा लोकांना समर्थांनी बजावलं,
प्रपंची जो सावधान। तो परमार्थ करीत जाण। प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा||
चांगला प्रपंच करणारा संसारी माणूस परमार्थही चांगला करू शकतो. जो संसाराची मूलभूत कर्तव्ये नीट पार पाडत नसेल, तो परमार्थाच्या गहन विषयात कसा प्रगती करणार?
समर्थांच्या उपदेशाला भक्कम व्यावहारिक आणि आध्यातिक बैठक होती. गृहस्थाश्रमात राहून प्रपंचधर्म सांभाळत, आतून उन्नत होत देवाच्या जवळ जाता येते. हा मंत्र त्यांनी जनलोकांना दिला. त्या वाटेवरच्या पायऱ्याही त्यांनी समजावून सांगितल्या. त्या पायऱ्या म्हणजे सदाचार, कर्तव्यनिष्ठा, संयम आणि विवेक. आळसકાળે નિવેષन करता विवेकी माणसाने या वाटेने चालावे, असे त्यांचे कळकळीचे सांगणे आहे.