सिंचन घोटाळ्याच्या फाईलबाबत २५ वर्षे चुप्पी का?

 महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अजित पवारांना सवाल


मुंबई : पुरंदरमधील सिंचन प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार १९९९ पासून २५ वर्षे गप्प का राहिले, असा थेट सवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच अजित पवारांकडून अशी अपेक्षा नव्हती," अशी खंतही व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारवर सिंचन प्रकल्पात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, "१९९९ ला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हा माझ्याकडे जलसंपदा खाते आले. तेव्हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली. मी पाहिली असता त्यामध्ये या योजनेची रक्कम ३१० कोटी रुपये असल्याचे आढळून आले. मात्र मी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी या प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारने वाढवल्याचे सांगितले. या प्रकल्पाची किंमत २०० कोटी रुपयेच असल्याचे त्या अधिकाऱ्याने कबुल केले. पुढे त्या अधिकाऱ्याने असेही सांगितलं की, १०० कोटी रुपये पार्टी फंडासाठी मागण्यात आले होते. मग आम्ही अधिकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आमचे १० कोटी वाढवले आणि प्रकल्पाची किंमत ३१० कोटी झाली. ती फाईल अजुनही माझ्याकडे आहे. ती जर काढली असती तर हाहाकार माजला असता," असा दावा अजित पवारांनी केला आहे.

त्यावर महसूलमंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. "१९९९ ते २०२४ हा मोठा काळ आहे. १९९९ ला जेव्हा अजित पवार यांच्याकडे ही फाईल आली होती, तेव्हा आरोप केले असते तर आम्ही समजले असते. मात्र एवढ्या उशिरा असा आरोप करणे योग्य नाही. जनता यावर विश्वास करणार नाही. शिवाय अजित पवारांकडून अशी अपेक्षा नव्हती," अशी खंतही बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.
......
अजित पवार त्रस्त - बावनकुळे

"पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीमुळे अजित पवार त्रस्त आहेत. त्यांच्यात नकारात्मकता आहे. मात्र, त्यांनी मनभेद, मतभेद होईल असे वागले नाही पाहिजे. युतीच्या समन्वय समितीमध्ये जरी मी असलो, तरी अजित पवार हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अजित पवारांना दोन्ही राष्ट्रवादी एक करायची आहे की नाही, हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. जेव्हा अधिकृत घोषणा होईल तेव्हा आम्ही त्यावर चर्चा करू," असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वेवर रविवारी ३० ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक; अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावणार, ट्रान्स-हार्बर सेवाही बंद

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे अभियांत्रिकी आणि देखभालीची विविध कामे पूर्ण करण्यासाठी रविवार, ३०

Ramdas Athawale : कामाठीपुऱ्यातील महिलांसोबत रामदास आठवलेंनी साजरे केले रक्षाबंधन; पुनर्वसन आणि रोजगारासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार

मुंबई : रक्षाबंधनाच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

Bandhu Marathi Film : ‘बंधू’ चित्रपटातून अभिनेता रजत बेदीची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; म्हणाला, "कथानकाने माझं लक्ष्य वेधलं"

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रजत बेदी (Rajat Bedi) आता 'बंधू' या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीचा विस्तार आणखी

Glaciers in the Himalayas : हिमालयात लपलेत २४३१ ‘धोक्याची सरोवरे’; फुटली तर माजू शकतो महापूर

नवी दिल्ली : हिमालयातील हिमनद्या वेगाने मागे सरकत असताना त्यातून निर्माण होणाऱ्या हिमनदीय सरोवरांच्या वाढत्या

Nepal Flood Update : ६० वा वाढदिवस साजरा करायला गेले अन्... नेपाळमधील महापुरात अमेरिकेतील भारतीय दांपत्य बेपत्ता, मुली एका कॉलच्या प्रतीक्षेत

नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात निसर्गाने घडवलेल्या भीषण तांडवामुळे हजारो भाविक आणि पर्यटक संकटात सापडले

Orry broke his silence on dispute : "माझ्यासाठी तो काळ नरकासारखा होता"; ओरीच साराच्या आईसोबत काय वाकड ? सारा सोबतची मैत्रीही तुटली, धक्कादायक खुलासे

मुंबई : सोशल मीडिया स्टार ओरहान अवत्रामणी म्हणजेच सर्वांचा लाडका 'ओरी' (Orry) सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा