Weather Update :महाराष्ट्रातील पुढील काही तास महत्त्वाचे,वारे आणि तुरळक पावसाचा इशारा

Weather Update : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राभर सध्या हवामानाची चंचलता पाहायला मिळत आहे. मुंबईत थंडीचा जोर काहीसा कमी झाला असला तरी हवेत गारवा वाटत आहे. सकाळी आणि रात्री थंड वातावरण, तर दुपारी अचानक तापमान वाढल्याने उष्णता जाणवायला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत हा तापमानातील तफावत नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे. काही ठिकाणी गारठ्याची परिस्थिती असून थंडीचा कडाका जाणवत आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील 72 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिण भारतातील काही भागांत जोरदार वारे आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नसली, तरी ढगाळ वातावरण, जोरदार वारे आणि काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळू शकतात, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

मकर संक्रांतीपर्यंत हवामानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज आहे. थंडीची तीव्र लाट नसली तरी गारवा कायम राहणार आहे. मात्र मकर संक्रांतीनंतर तापमानात हळूहळू वाढ होऊन थंडीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यात रविवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. कडाक्याच्या थंडीने गारठलेल्या सांगलीकरांना अचानक झालेल्या पावसाचा अनुभव घ्यावा लागला. रात्री रिमझिम पावसामुळे वातावरणात गारवा वाढला असून महापालिका निवडणुकीच्या प्रचारावरही त्याचा परिणाम झाला. याआधी मुंबई आणि पुण्यातही काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या.

सतत बदलणाऱ्या हवामानामुळे राज्यभरात सर्दी, ताप यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसत असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
Comments
Add Comment

Chrome Security Alert : Google Chrome वापरताय? थांबा...पहिलं हे काम करा, केंद्र सरकारचा हाय-अलर्ट

मुंबई : तुम्हीही रोजच्या कामासाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर 'गुगल क्रोम' (Google Chrome) ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी

Mumbai Update : मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; 3,177 रुग्णांची नोंद, डेंग्यू-लेप्टोमध्ये मात्र घट

Mumbai : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना तीव्र

Mumbai Navy Nagar News : नौदल जवान, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू; मुंबईतील 'नेव्ही नगर'मध्ये धक्कादायक घटना

राजस्थान : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ककराना गावातील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान

Jalgaon News : ग्रामसभेत गोंधळ, शिवीगाळ अन्...; ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ग्रामसभेत (Gram Sabha) झालेला

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण

Rishabh Pant New Record : षटकारांचं शतक तेही सर्वात जलद! रिषभ पंतने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

गॉल : भारताचा स्टार विकेटकीपर-बॅटर रिषभ पंतने (Rishabh Pant) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात इतिहास